दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी NIAची छापेमारी

By admin | Published: June 3, 2017 08:48 AM2017-06-03T08:48:27+5:302017-06-03T10:46:50+5:30

राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) शनिवार (3 जून) जम्मू काश्मीर, नवी दिल्ली, हरियाणा येथे धाडसत्र सुरू केले

Raiding the NIA for financial blockade of militants | दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी NIAची छापेमारी

दहशतवाद्यांची आर्थिक नाकेबंदी करण्यासाठी NIAची छापेमारी

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 3 - राष्ट्रीय तपास संस्थेनं (NIA) शनिवारी (3 जून) जम्मू काश्मीर, नवी दिल्ली, हरियाणा येथे धाडसत्र सुरू केले आहे. जम्मू काश्मीरमधील 14 तर नवी दिल्ली व हरियाणातील 8 ठिकाणांवर धाड टाकण्यात आली आहे. विघातक कारवाया वाढवणा-या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवठा होत असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेनं ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे .
 
नईम अहमद यांच्या घरावरही NIAनं धाड टाकली आहे.  ते फुटीरतावादी नेते होते. त्यांनी स्टिंग ऑपरेशनमध्ये पाकिस्तानकडून पैसे घेतल्याची बाब मान्य केली होती. यानंतर त्यांची हुर्रियतमधून हकालपट्टी करण्यात आली. 
 
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तय्यबाचा म्होरक्या हाफिज सईद आणि कट्टरतावादी काश्मिरी फुटीरतावादी नेता सय्यद अली शाह गिलानी यांच्या काश्मीर खो-यातील विघातक कारवायांमधील भूमिकांबाबतही राष्ट्रीय तपास संस्था चौकशी करत आहे.
 
नईम खान यांच्याही नावाचा समावेश आहे. एका वृत्तवाहिनीवर दाखवण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये  पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांकडून  पैसे स्वीकारल्याची बाब नईम खान यांनी मान्य केली होती. 
 
 

Web Title: Raiding the NIA for financial blockade of militants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.