रेल्वे कंत्राट प्रक्रिया करणार ऑनलाइन
By admin | Published: March 5, 2016 06:50 PM2016-03-05T18:50:29+5:302016-03-05T18:50:29+5:30
कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी कंत्राट प्रकिया ऑनलाइन करण्याचा विचार रेल्वे करत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. ५ - कंत्राट प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी कंत्राट प्रकिया ऑनलाइन करण्याचा विचार रेल्वे करत आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांन दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.
कंत्राटाची खरेदी तसंच संबंधित कागदपत्र ऑनलाइन दाखल केली जातात त्यामुळे कंत्राट देण्याची प्रक्रियादेखील ऑनलाइन करण्याचा विचार रेल्वे करत आहे. ई-टेंडरींगमुळे पारदर्शकता वाढेलं तसंच लाच देण्या-घेण्याचे प्रकारही थांबतील. रेल्वेमध्ये याअगोदर अनेक घोटाळे झाले आहेत. रेल्वेत नोकरी देण्याच अमिष तसंच जमीन हडपण्याचे प्रकारही झाले आहेत. त्यामुळे असे घोटाळे पुन्हा होऊ नयेत यासाठी ऑनलाइन प्रक्रियेचा विचार केला जात आहे.