१ जूनपासून रेल्वेच्या एसी भाड्यात वाढ
By admin | Published: May 30, 2015 11:44 PM2015-05-30T23:44:26+5:302015-05-30T23:44:26+5:30
रेल्वेतर्फे येत्या १ जूनपासून प्रथम आणि वातानुकूलित श्रेणीतील प्रवासी भाड्यासोबतच मालभाड्यातही ०.५ टक्के वाढ करण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : रेल्वेतर्फे येत्या १ जूनपासून प्रथम आणि वातानुकूलित श्रेणीतील प्रवासी भाड्यासोबतच मालभाड्यातही ०.५ टक्के वाढ करण्यात येणार आहे. नवा सेवाकर लागू झाल्याने हा भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, तूर्तास वातानुकूलित आणि प्रथमश्रेणी प्रवासी भाडे व मालभाड्यावर ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. जूनपासून तो ४.२ टक्के होणार असल्याने केवळ ०.५ टक्के भाडेवाढ होईल. एसीचे भाडे १ हजार रुपये असेल तर प्रवाशाकडून आणखी १० रुपये घेतले जातील. सेवाकरावरील वाढ १ जून आणि त्यानंतर खरेदी केलेल्या तिकिटांवर लागू असेल आणि फक्त उपरोक्त दोन श्रेणींसाठीच ती असेल. (वृत्तसंस्था)