रेल्वेनं टाकली कात, अनेक नियमांत सुधारणा
By admin | Published: June 1, 2016 06:17 PM2016-06-01T18:17:23+5:302016-06-01T18:20:11+5:30
भारतीय रेल्वेनं कात टाकली असून, आधीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1- भारतीय रेल्वेनं कात टाकली असून, आधीच्या काही नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदललेल्या नियमांचा लाखो लोकांना फायदा होणार आहे. 1 जूनपासून म्हणजेच आजपासून हे नियम लागू होणार आहेत. विशेष म्हणजे रेल्वेनं तात्काळ तिकीट आणि कन्फर्म तिकिटांच्या परताव्याचे नियम शिथिल केले आहेत.
प्रवाशांना आता तात्काळ तिकीट रद्द केल्यास 50 टक्के परतावा मिळणार आहे. तात्काळ तिकीट बुक करण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. एसी कोचची तात्काळ तिकीट बुक करण्याची खिडकी सकाळी 10 आणि 11 वाजताच्या दरम्यान उघडणार आहे. तर स्लीपर कोचची तिकीट बुक करण्याची खिडकी सकाळी 11 ते रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहणार आहे. सुविधा ट्रेनसाठी 1 जूनपासून प्रतीक्षा यादीही लावण्यात येणार नाही आहे. कन्फर्म तिकीट आणि आरएसी म्हणजे रिझर्व्हेशन अगेन कॅन्सल तिकीट असलेल्या प्रवाशांचीच फक्त कोचमध्ये व्यवस्था होणार आहे.
राजधानी आणि शताब्दी या ट्रेनचे डबेही वाढवण्यात येणार आहेत. शताब्दीचे तिकीट कागद विरहित करण्यात आले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. शताब्दीसाठी मोबाईल तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. बदललेल्या नियमांमुळे आता रेल्वेमध्ये विविध भाषांमध्ये तिकीट बुक करता येणार आहे. तिकीट रद्द केल्यास एअर कंडिशन टू टीअर 100, एअर कंडिशन थ्री टीअर एकॉनॉमी 90 आणि स्लीपर क्लासची तिकीट रद्द केल्यास 60 रुपये द्यावे लागणार आहेत.