हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

By admin | Published: January 22, 2015 12:07 AM2015-01-22T00:07:36+5:302015-01-22T00:07:36+5:30

हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

Rail traffic on Howrah-Mumbai road disrupted | हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत

Next
वडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत
सहा गाड्या रद्द : पानपोस-कलुंदा दरम्यान रेल रोको आंदोलन
नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या चक्रधरपूर विभागात पानपोस-कलुंगा रेल्वेस्थानकादरम्यान स्थानिक समस्यांसाठी नागरिकांनी रेलरोको आंदोलन केल्यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलविण्यात आले. दरम्यान सहा रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक दिवसभर विस्कळीत होऊन प्रवाशांची गैरसोय झाली.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार डाऊन लाईनवरील १२८३३ हावडा-अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस झारसुगुडा-संभलपुर-अंगुल-कटक-भद्रक या मार्गाने वळविण्यात आले. १२८५९ मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस झारसुगुडा-संभलपूर-अंगुल-कटक-भद्रक या मार्गाने, १३२८७ दुर्ग-दानापूर साऊथ बिहार एक्स्प्रेस कटनी-सिंगरोली-चौपन-गया जंक्शन-पटणा या मार्गाने, १८०२९ कुर्ला-शालिमार एक्स्प्रेस रायपूर-टिटलागड-संभलपूर या मार्गाने, १२८०९ मुंबई-हावडा एक्स्प्रेस झारसुगुडा-संभलपूर-अंगुल-कटक-भद्रक या मार्गाने, १२१२९ पुणे-हावडा आझाद हिंद एक्स्प्रेस झारसुगुडा-संभलपूर-अंगुल-कटक-भद्रक या मागारने, १२१३० कुर्ला-हावडा सुपरफास्ट ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस झारसुगुडा-संभलपूर-अंगुल-कटक-भद्रक या मार्गाने, १३४२६ सुरत-मालदा एक्स्प्रेस झारसुगुडा-संभलपूर-अंगुल या मार्गाने वळविण्यात आली. अप मार्गावरील १२२६२ हावडा-मुंबई एक्स्प्रेस कपीलस रोड-अंगुल-संभलपूर-झारसुगुडा-बिलासपूर या मार्गाने, १२८६० हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस कपीलस रोड-अंगुल-संभलपूर-झारसुगुडा-बिलासपूर या मार्गाने, १२८१० हावडा-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस कपीलस रोड-अंगुल-संभलपूर-झारसुगुडा-बिलासपूर या मार्गाने, १२९०६ हावडा-पोरबंदर एक्स्प्रेस टाटा-सिनी-मुरी-चोपन-न्यु कटनी-जबलपूर-इटारसी-जळगाव या मार्गाने, १२८३४ हावडा-अहमदाबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस टाटा-सिनी-मुरी-चोपन-न्यु कटनी-जबलपूर-इटारसी-जळगाव या मार्गाने, १२१३० हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस खडगपूर-भद्रक-संभलपूर-झारसुगुडा या मार्गाने, १७००८ रक्सुल-सिकंदराबाद एक्स्प्रेस मुरी-सिनी-टाटा-कलाईकुंडा-भद्रक-अंगुल-संभलपूर-झारसुगुडा या मार्गाने, १८०३० शालिमार-कुर्ला एक्स्प्रेसला गुरु हरसहाई येथे रद्द करण्यात आले. कामाख्यावरून सुटणारी २५१२ कामाख्या-पुणे एक्स्प्रेस कपीलस रोड-अंगुल-संभलपूर-झारसुगुडा-बिलासपूर या मार्गाने, १८४७७ पुरी-हरिद्वार उत्कल कालिंगा एक्स्प्रेस टाटा-सिनी-मुरी-चोपन-न्यु कटनी या मार्गाने तर १८०३० शालिमार-कुर्ला एक्स्प्रेस खडगपुर-भद्रक-संभलपूर-झारसुगुडा या मार्गाने वळविण्यात आली आहे.
...................
सहा रेल्वेगाड्या केल्या रद्द
-१२२६२ हावडा-मुंबई एक्स्प्रेस
-५८१११ टाटा-इतवारी पॅसेंजर
-१३२८८ दानापूर-दुर्ग एक्स्प्रेस
-१२२६१ मुंबई-हावडा एक्स्प्रेस
-१२८६० हावडा-मुंबई एक्स्प्रेस
-१८०२९ कुर्ला-शालिमार एक्स्प्रेस
.........

Web Title: Rail traffic on Howrah-Mumbai road disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.