पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2024 11:15 AM2024-09-22T11:15:09+5:302024-09-22T11:15:48+5:30
Railway Accident In Bihar: मागच्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने रेल्वे अपघात होत आहेत. त्यात बिहारमध्येही रेल्वे अपघातांची मालिका सुरू असून, बक्सर, किशनगंज आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातांनंतर आज पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे.
मागच्या काही दिवसांपासून देशभरात सातत्याने रेल्वेअपघात होत आहेत. त्यात बिहारमध्येहीरेल्वेअपघातांची मालिका सुरू असून, बक्सर, किशनगंज आणि मुझफ्फरनगर जिल्ह्यात झालेल्या रेल्वे अपघातांनंतर आज पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात आज मुझफ्फरपूर-पुणे स्पेशल ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुझफ्फरपूर-समस्तीपूर मार्गावर इंजिनाचं ६ चाकं रुळावरून घसरली. दरम्यान, इंजिनाला रुळावर आणण्याचं काम सुरू आहे.
हा अपघात मुझफ्फरपूर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर झाला आहे. मुझफ्फरपूर-पुणे स्पेशल ट्रेनचं इंजिन रुळावरून घसरल्याने मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीसीएमसह अनेक अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच एआरटीच्या टीमकडून इंजिनाला रुळावर आणण्याचं काम करण्यात येत आहे. तसेच घटनेची माहिती सोनपूर रेल्वे विभागाला देण्यात आली आहे.
मुझफ्फरपूरमध्ये एका आठवड्यामध्ये झालेला हा दुसरा रेल्वे अपघात आहे. दोन दिवसांपूर्वीच मुझफ्फरपूरमधील नारायणपूर स्टेशनपासून काही अंतरावर एका मालगाडीचे सहा डबे रुळावरून घसरले होते. भिलाई येथून मुझफ्फरपूर येथे आलेली मालगाडी नारायणपूर स्टेशन येथे शंटिगमध्ये आणण्यात येत होती. तेव्हा ट्रेनचे सहा डबे रुळावरून घसरले होते.