रेल्वे मंडळाचे अध्यक्ष मित्तल यांनाच मुदतवाढ
By admin | Published: July 30, 2016 02:08 AM2016-07-30T02:08:19+5:302016-07-30T02:08:19+5:30
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देऊन आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांची मुदतवाढ एक आॅगस्ट २०१६ पासून
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए. के. मित्तल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देऊन आश्चर्याचा धक्काच दिला. त्यांची मुदतवाढ एक आॅगस्ट २०१६ पासून ते वयाची ६२ वर्षे पूर्ण करीपर्यंत राहील.
मोदी यांनी मित्तल यांना मुदतवाढ देण्यास नकार देऊन अध्यक्षाचा शोध घेण्यासाठी समिती स्थापन करण्यास व मंत्रिमंडळ सचिवांना शोध समितीचे समन्वयक म्हणून काम करण्यास सांगितले होते. एअर इंडियाचे विद्यमान अध्यक्ष अश्वनी लोहानी हे या शर्यतीत पुढे होते कारण ते रेल्वे सर्व्हीस केडरमधील होते. परंतु ते मंडळात नऊ टप्पे कनिष्ठ होते. दुसरे म्हणजे ते एअर इंडियाला ताजेतवाने करण्याचे काम सध्या करीत आहेत.
या पार्श्वभूमीवर मोदी यांनी मित्तल यांना दोन वर्षे मुदतवाढ देण्यास समंती दिली. या दोन वर्षांत किमान पाच वरिष्ठ अधिकारी सेवानिवृत्त होत असून त्यामुळे लोहानी यांचा मार्ग प्रशस्त होईल.