रेल्वे कर्मचा-यांची दरवर्षी मेडिकल तपासणी , आरोग्य शिबिरातच कर्मचा-यांना करता येणार गोपनीय तक्रारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:54 AM2017-12-18T00:54:43+5:302017-12-18T00:55:19+5:30
रेल्वेतील प्रत्येक कर्मचा-याची वर्षातून एकदा मेडिकल तपासणी होणार असून या कर्मचा-यांना आता त्यांच्या तक्रारी रेल्वे मंत्री अथवा रेल्वे बोर्डापर्यंत पोहचविण्यासाठी मदत मिळणार आहे. यासाठी कर्मचाºयांना अधिकाºयांकडे आणि रेल्वे बोर्डात चकरा माराव्या लागणार नाहीत. ते घराजवळ व कार्यालयाजवळच तक्रार करु शकतील. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत.
संतोष ठाकूर

रेल्वे कर्मचा-यांची वैद्यकीय तपासणी आता दरवर्षी जानेवारीत पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले आहे की, जर कर्मचारी स्वस्थ नसेल तर त्याचा आवाज रेल्वे बोर्डापर्यंत पोहचणार नाही. त्यामुळे कर्मचाºयांना या सुविधा देण्यात येणार आहेत. रेल्वे मंत्र्यांनी रेल्वे बोर्डाला असा सल्ला दिला आहे की, सर्व कर्मचाºयांची बेसिक मेडिकल तपासणी करण्यात यावी. यासाठी रेल्वे सेंट्रल हॉस्पिटल किंवा खासगी कंपनीसोबत शिबिरे घेण्यात यावीत. या शिबिरात दोन्ही बाबी साध्य होतील. कर्मचाºयांची मेडिकल तपासणी होईल आणि आपली तक्रार दाखल करण्याची सुविधा याच ठिकाणी उपलब्ध असेल. यासाठी एक तक्रार पेटी मेडिकल तपासणीच्या शिबिरात ठेवण्यात येईल. आपले नाव न लिहिता कर्मचारी यात तक्रार देऊ शकतो. एका अधिकाºयाने सांगितले की, जानेवारी २०१८ पर्यंत रेल्वेच्या सर्व १३ लाखांपेक्षा अधिक कर्मचाºयांची बेसिक मेडिकल तपासणी पूर्ण करण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी मेडिकल शिबिरे सुरु करण्यात येणार आहेत. हे शिबिरे सुरु करताना काही तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी येत आहेत. यावेळी ज्या अशा अडचणी समोर येतील त्यात पुढील वर्षी सुधारणा करण्यात येणार आहे. रेल्वेच्या कोणत्या कर्मचाºयाला कोणत्या प्रकारचे उपचार देण्याची गरज आहे, हे यातून समजणार आहे.