Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 05:02 PM2021-08-20T17:02:40+5:302021-08-20T17:02:52+5:30

Indian Railways: अश्विनी वैष्णव यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

railway minister ashwini vaishnaw interacted with passengers and took feedback regarding services and hygiene | Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

Indian Railways: प्रवाशांना काय वाटते? फीडबॅक घेण्यास रेल्वेमंत्री अचानक ट्रेनमध्ये पोहोचले आणि...

Next

भुवनेश्वर: कोरोनाच्या कालावधीनंतर भारतीय रेल्वे टप्प्याटप्प्याने प्रवासी सेवा पुन्हा सुरू केली आहे. कोरोना काळात भारतीय रेल्वेला मोठा आर्थिक फटका बसला. केंद्रात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळी रेल्वे मंत्रालयात खांदेपालट करून पीयूष गोयल यांच्याऐवजी अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्री करण्यात आले. यानंतर रेल्वेमंत्री यांनी धडाक्यात कामाला सुरुवात केली. यानंतर प्रवाशांना भारतीय रेल्वेबाबत काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव थेट ट्रेनमध्ये पोहोचले. (railway minister ashwini vaishnaw interacted with passengers and took feedback regarding services and hygiene)

“सध्या मी दिवसातून एकदाच जेवतो”; PM मोदींनीच केला यामागील खुलासा

भारतीय रेल्वेच्या सेवांबद्दल प्रवाशांना काय वाटते, हे जाणून घेण्यासाठी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे प्रवास केला. या प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांशी गप्पा मारल्या आणि रेल्वे सेवांबद्दल फीडबॅक घेतला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रेल्वे आणि देशातील विकासाबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दलही सांगितले. वैष्णव हे भुवनेश्वर येथे जनआशीर्वाद यात्रा सुरू करण्यासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी भुवनेश्वर ते रायगडा ट्रेनमध्ये प्रवास केला. त्यांना रेल्वेत प्रवास करताना बघून प्रवाशांना आश्चर्याचा धक्का बसला.

मोदी सरकार आता रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या तयारीत?; ३० हजार कोटी उभारण्याचा मानस

प्रवाशांना ट्रेनचा प्रवास आरामदायी होतो का

भुवनेश्वरहून रायगडाच्या दिशेने रात्रभर प्रवास करताना त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला आणि रेल्वेबद्दल प्रवाशांचे मत काय तसेच स्वच्छतेबद्दल त्यांचे फीडबॅक जाणून घेतले. प्रवाशांशी संवाद साधताना, ट्रेनमधील सुविधांबाबत विचारले. प्रवाशांना ट्रेनचा प्रवास आरामदायी होतो का, असेही विचारले. तसेच रेल्वेत स्वच्छ भारत अभियानच्या नियमांचे पालन केले जात आहे की नाही, याबद्दल प्रश्न विचारले. तसेच रेल्वेतील तरुणांशी संवाद साधून नवीन भारताविषयीचा त्यांचा दृष्टिकोन जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतीय रेल्वेने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

दरम्यान, रेल्वेमंत्र्यांना भेटून मला खूप आनंद झाला. ते खूप चांगले आणि मनमिळावू व्यक्ती आहेत. ते तरुणांना प्रोत्साहन देतात, अशी प्रतिक्रिया एका महिला प्रवाशाने दिली. ही एक पूर्णपणे वेगळी भावना आहे. तुम्ही एखाद्या मिशनवर असताना भारताची लाइफलाइन असलेल्या रेल्वेत प्रवास करणे हा अनूभव वेगळाच आहे. हा प्रवास आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देतो. रेल्वेमंत्री म्हणून मी स्वतः हा फिडबॅक घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच गेल्या काही वर्षांमध्ये रेल्वेतील सोई-सुविधा सुधारल्या आहेत, याचे प्रवाशांनी कौतुक केले आहे. रेल्वे आधीपेक्षा जास्त स्वच्छ असतात, त्यामुळे प्रवास करण्याचा आनंद द्विगुणीत होतो, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
 

Web Title: railway minister ashwini vaishnaw interacted with passengers and took feedback regarding services and hygiene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.