'वंदे भारत'बाबत आणखी एक आनंदाची बातमी! आता 'या' नव्या मार्गावर धावणार ट्रेन; जाणून घ्या सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 04:38 PM2024-02-08T16:38:56+5:302024-02-08T16:40:29+5:30
देशात अनेक शहरांत वंद भारत रेल्वे सुरू झाली आहे, आता आणखी काही नवीन गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारने देशात नव्या वंदे भारत गाड्या आणल्या आहेत. गेल्या काही वर्षांत वंदे भारत गाड्यांवर भरपूर लक्ष केंद्रित केले आहे. वंदे भारत गाड्या एकामागून एक नवीन मार्गांवर सुरू होत आहेत. आता भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. वंदे भारत ट्रेन आणखी एका नवीन मार्गावर धावणार आहे. ही ट्रेन कर्नाटकातील बेळगावी ते पुणे दरम्यान धावणार आहे. केंद्र सरकारनेही यासाठी मान्यता दिली आहे. राज्यसभा खासदार आणि भाजप नेत्या इराणा काडादी यांनी ही माहिती दिली आहे.
आज लोकसभा निवडणूक झाली तर...; आजतक-सीव्होटरचा दुसरा सर्व्हे, मोदी खरेच ३७०+
वंदे भारत या नव्या मार्गावर धावण्याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काडादी यांना पत्र लिहून यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली आहे. मात्र, बेळगाव ते पुणे दरम्यान वंदे भारत कधी सुरू होईल याची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. ही ट्रेन सुरू झाल्यामुळे प्रवाशांना कमी वेळेत पोहोचता येण्याबरोबरच व्यापार आणि पर्यटनालाही चालना मिळेल, असा विश्वास आहे. गेल्या वर्षी डिसेंबरच्या अखेरीस पीएम मोदींनी पाच वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता. अयोध्येतून सुरू झालेल्या या गाड्या आता विविध मार्गांवर धावू लागल्या आहेत.
देशात ८२ वंदे भारत गाड्या
वंदे भारत गाड्यांची संख्या ८२ पर्यंत वाढवली आहे आणि नवी दिल्ली-मुंबई आणि नवी दिल्ली-हावडा रेल्वेवर या गाड्यांचा वेग ताशी १६० किलोमीटरपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. वंदे भारत गाड्यांबाबत १० खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांच्या लेखी उत्तरात रेल्वे मंत्र्यांनी ही माहिती दिली. ३१ जानेवारी, २०२४ पर्यंत, ८२ वंदे भारत गाड्या कार्यरत होत्या,रेल्वे मंत्री म्हणाले, "याशिवाय, गाड्या थांबवण्याची तरतूद आणि वंदे भारतसह नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याची प्रक्रिया चालू आहे.