रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गतिमान एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

By admin | Published: April 5, 2016 11:04 AM2016-04-05T11:04:41+5:302016-04-05T11:18:43+5:30

बहुप्रतिक्षित गतिमान एक्सप्रेसला मंगळवारी रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी हिरवा झेंडा दाखवला.

Railway Minister Suresh Prabhu showed the dynamic flag display | रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गतिमान एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी गतिमान एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - बहुप्रतिक्षित गतिमान एक्सप्रेसला आज (मंगळवार) रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी हिरवा झेंडा दाखवला. दिल्ली ते आग्रादरम्यान चालणा-या या गाडीला सुरेश प्रभू यांनी हजरत निजामुद्दीन स्टेशनवर हिरवा झेंडा दाखवल्यावर ही गाडी रवाना झाली. गतिमान एक्र्स्प्रेसची सुरुवात रेल्वेसाठी एक महत्वाचं पाऊल ठरेल, असा विश्वास यावेळी रेल्वेमंत्र्यांनी व्यक्त केला.
गतिमान एक्सप्रेस ही देशातील पहिली सेमी हाय-स्पीड ट्रेन असून ती दिल्ली-आग्रा मार्गावर १६० कि.मी. प्रतितास वेगाने धावणार असून २०० किमीचे अंतर ही एक्सप्रेस ११० मिनिटात पार करेल.
 
 
काय आहेत ट्रेनची वैशिष्ट्ये?
- ही देशातील पहिली अशी ट्रेन आहे ज्यामध्ये विमानातील हवाई सुंदरीप्रमाणे ट्रेन सुंदरी असतील. 
- प्रवाशांना विमानात जशा उच्च दर्जाच्या सुविधा मिळतात तशाच खानपानापासून सर्व सुविधा या ट्रेनमध्ये देण्याचा प्रयत्न आहे.
- या ट्रेनच्या तिकीटासाठी शताब्दी एक्सप्रेसपेक्षा २५ टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. या ट्रेनमधील सुंदरी फूल देऊन प्रवाशाचे स्वागत करणार आहेत. 
- या ट्रेनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या ट्रेनमध्ये चेअर कारसाठी ६९० रुपयाचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. एक्झिक्युटीव्ह क्लासमधून प्रवास करण्यासाठी १३६५ रुपये मोजावे लागतील. 
- दिल्ली-आग्रा मार्गावर धावणा-या शताब्दी एक्सप्रेसचे चेअर कारचे शुल्क ५४० आणि एक्झिक्युटीव्ह क्लासचे शुल्क १०४० रुपये आहे. 
 

Web Title: Railway Minister Suresh Prabhu showed the dynamic flag display

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.