स्थानकातील अस्वच्छतेमुळे रेल्वेचे दोन अधिकारी निलंबित
By admin | Published: January 9, 2016 02:36 AM2016-01-09T02:36:06+5:302016-01-09T02:36:06+5:30
तुमसर रेल्वेस्थानक : एकाला कारणे दाखवा नोटीस
Next
त मसर रेल्वेस्थानक : एकाला कारणे दाखवा नोटीसभंडारा : देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात येत असताना रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेबाबत गलथानपणा बाळगणे दोन रेल्वे अधिकार्यांना भोवले आहे. स्थानक परिसरातील अस्वच्छतेमुळे विदर्भातील तुमसर रोड रेल्वेस्थानक अधिक्षक आणि साहाय्यक स्टेशन मास्टर यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे, तर अन्य एका स्टेशन अधिक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आाली आहे.नागपूरचे विभागीय रेल्वे महाव्यवस्थापक आलोक कन्सल यांनी बुधवारी तुमसर रेल्वे स्थानक व परिसरातील रेल्वे रुग्णालय, रेल्वे सदनिका परिसर, रेल्वे उद्यानाची पाहाणी केली. यात स्थानक परिसरात अस्वच्छता दिसून आल्यामुळे त्यांनी तुमसर रोड रेल्वेचे स्थानक अधीक्षक आर. जी. भोवते, सहाय्यक स्टेशन मास्टर सुजितकुमार यांना निलंबित केले. तसेच दुसरे रेल्वे स्थानक अधीक्षक कृपाल राम यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.पाहाणीच्या वेळी कन्सल यांच्यासोबत वरिष्ठ डिसीएम चिन्मय मुखोपाध्याय, वरिष्ठ डीओएम सचिन शर्मा, आदी अधिकारी होते. तुमसर रेल्वे स्थानक अधीक्षक आर.जी. भोवते यांनीच स्वत:चे निलंबन झाल्याचे ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)