भरपाई देण्याचा रेल्वेला आदेश
By Admin | Published: June 19, 2016 04:51 AM2016-06-19T04:51:30+5:302016-06-19T04:51:30+5:30
रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडणारी व्यक्ती खरेच प्रवासी होता की नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे असे निरीक्षण देत, मद्रास उच्च न्यायालयाने रेल्वे दावा लवादाचा अशा
मुदराई : रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडणारी व्यक्ती खरेच प्रवासी होता की नाही, हे सिद्ध करण्याची जबाबदारी रेल्वेची आहे असे निरीक्षण देत, मद्रास उच्च न्यायालयाने रेल्वे दावा लवादाचा अशा दोन कुटुंबीयांना नुकसान भरपाई नाकारणारा आदेश अमान्य केला.
न्यायाधीशांनी लवादाद्वारे दोन प्रवाशांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई न देण्याचा निर्णय रद्द केला. या दोन प्रवाशांचा २००२ आणि २००६ साली चेन्नईत रेल्वेतून प्रवास करताना मृत्यू झाला होता. न्यायालयाने दक्षिण रेल्वेला दावेदारास चार लाख रुपये भरपाई देण्याचे आदेशही दिले.
मृत व्यक्तीचे नातेवाईक तिकीट सादर करण्यात अपयशी ठरल्याच्या कारणावरून रेल्वेने त्यांना भरपाई नाकारली होती. टी. जगन नामक व्यक्तीच्या पालकांनी नुकसान भरपाईचा दावा सादर केला होता. तो एप्रिल २००६ मध्ये खांबाची धडक लागून मरण पावला होता. दुसरी याचिका कामगाराच्या पत्नी व मुलांनी दाखल केली होती. २८ मे २००२ रोजी अशाच प्रकारच्या घटनेत त्याचा मृत्यू ओढावला होता. (वृत्तसंस्था)