सर्व राजकीय जाहिराती हटविण्याचे रेल्वेचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 08:13 AM2019-04-01T08:13:53+5:302019-04-01T08:14:42+5:30
रेल्वेगाड्यांमध्ये चहासाठी दिल्या जाणाऱ्या कागदी ग्लासवर भाजपची ‘मै भी चौकीदार’ ही निवडणूक घोषणा छापण्यावरून मोठा वाद झाला होता.
नवी दिल्ली : रेल्वेकडून दैनंदिन व्यवहारांत विविध प्रकारे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन होण्याचे प्रकार उघड झाल्यानंतर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी रेल्वेच्या आवारातून व रेल्वेशी संबंधित सर्व प्रकारच्या साहित्यांतून सर्व प्रकारच्या राजकीय जाहिराती तात्काळ हटविण्याचे आदेश रविवारी दिले.
रेल्वेगाड्यांमध्ये चहासाठी दिल्या जाणाऱ्या कागदी ग्लासवर भाजपची ‘मै भी चौकीदार’ ही निवडणूक घोषणा छापण्यावरून मोठा वाद झाला होता. तसेच रेल्वे तिकिटांच्या मागील बाजूस छापलेली पंतप्रधान मोदी यांची छायाचित्रे आचारसंहिता लागू झाल्यानंतरही कायम असण्यावरून रेल्वे प्रशासनास निवडणूक आयोगाने धारेवर धरले होते.
या पार्श्वभूमीवर रेल्वे मंडळाचे अध्यक्ष यादव यांनी सर्व विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना तातडीने एक संदेस पाठवून असे कळविले की, रेल्वेची तिकिटे, अन्य प्रकारची स्टेशनरी अथवा रेल्वेच्या आवारात अन्य कुठेही कोणत्याही राजकीय नेत्याचे छायाचित्र असलेल्या जाहिराती असतील त्या तात्काळ हटविल्या जाव्यात. जाहिरात एजन्सीलाही त्यासंबंधी योग्य त्या सूचना द्याव्या. आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल रेल्वेकडे खुलासा मागविण्यात आला आहे . तसेच याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची नावेही रेल्वेकडे मागितली आहेत, असे निवडणूक आयोगाने शनिवारी स्पष्ट केले होते.
त्याआधी रेल्वेतील खान-पान
सेवा व आरक्षणाचे काम पाहणाºया ‘आयआरसीटीसी’ने एका निवेदनात म्हटले होते की, ‘मै भी चौकीदार’ अशी
घोषणा छापलेल्या पेल्यातून रेल्वेमध्ये
चहा दिला जात असल्याबद्दल चौकशी केली गेली. ‘आयआरसीटीसी’ची
पूर्वानुमती न घेता असे केले जात होते. कामात कसूर केल्याबद्दल पर्यवेक्षक व
पॅन्ट्री प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आला असून सेवा पुरवठादार एजन्सीला एक लाख रुपये दंड करण्यात आला आहे. याबद्दल कंत्राट रद्द का करू नये अशी कारणे दाखवा नोटीसही एजन्सीला बजावण्यात आली आहे.
मागविला खुलासा
रेल्वेतील खान-पान सेवा व आरक्षणाचे काम पाहणाºया ‘आयआरसीटीसी’ने एका निवेदनात म्हटले होते की, ‘मै भी चौकीदार’ अशी घोषणा छापलेल्या पेल्यातून रेल्वेमध्ये चहा दिला जात असल्याबद्दल चौकशी केली गेली. ‘आयआरसीटीसी’ची पूर्वानुमती न घेता असे केले जात होते. कामात कसूर केल्याबद्दल पर्यवेक्षक व पॅन्ट्री प्रमुखांकडून खुलासा मागविण्यात आला असून सेवा पुरवठादार एजन्सीला एक लाख रुपये दंड करण्यात आला आहे.