रेल्वे प्रवाशांना आता फेसबूकवरही तक्रार करणं शक्य

By admin | Published: June 16, 2016 01:56 PM2016-06-16T13:56:33+5:302016-06-16T13:56:33+5:30

रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे

Railway passengers can now report on Facebook too | रेल्वे प्रवाशांना आता फेसबूकवरही तक्रार करणं शक्य

रेल्वे प्रवाशांना आता फेसबूकवरही तक्रार करणं शक्य

Next
>ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 16 - रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जाव्यात यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना आता ट्विटरसोबत फेसबूकवरुनही तक्रार करणं शक्य होणार आहे. 'मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज - इंडिया' (Ministry of Railways - India) नावाने हे फेसबूक पेज तयार करण्यात आलं आहे. रेल्वेचं हे फेसबूक पेज 24 तास रेल्वे बोर्डाच्या देखरेखीखाली असणार आहे. 
 
'रेल्वे सेवा सुधारण्यासाठी सर्वांनी आपलं योगदान द्याव. त्यासाठी सर्व फेसबूक वापरकर्त्यांना आमच्याशी संवाद साधण्याची विनंती करतो', असं सुरेश प्रभू बोलले आहेत. सध्या रेल्वे दिवसाला 7 हजार ट्विट्स हाताळते. ज्यामध्ये तक्रार, सल्ला आणि मदत अशा ट्विट्सचा समावेश असतो. 
 
रेल्वेचे ट्विटरवर 10 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. आपल्या कामाचा वेग वाढावा, रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजना करता यावी यासाठी आता फेसबूकचाही वापर करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. सर्व रेल्वे प्रवासी ट्विटरचा वापर करत नसल्याने इतर सोशल मिडियांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांशी जोडले जाण्याचा प्रयत्न यानिमित्ताने केला जाणार आहे.
'ट्विटरवर लाखो प्रवासी आपल्या तक्रारींची नोंद करत असल्याने ट्विटर प्रवाशांशी संपर्क साधण्याचं उत्तम माध्यम बनलं आहे. त्यामुळे त्याचा विस्तार करत आता फेसबूकलाही जोडत आहोत. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर संबंधित विभागीय रेल्वे व्यवस्थापकाकडे तक्रार पाठवण्यात येईल. तक्रार पाठवल्यानंतर काय कारवाई करण्यात आली यासाठी रेल्वे बोर्डाचं सोशल मिडिया सेल 24 तास पाहणी करेल. विशेष म्हणजे काय कारवाई करण्यात आली याची माहिती तक्रारकर्त्याला देखील फेसबूकवर दिली जाईलट, अशी माहिती सुरेश प्रभू यांनी दिली आहे.
 

Web Title: Railway passengers can now report on Facebook too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.