Railway Recruitment 2018 : रेल्वेत बंपर भरती, पाहा काय आहे अट आणि पात्रता?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2018 10:39 AM2018-05-20T10:39:51+5:302018-05-20T10:56:59+5:30

ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जून, 2018 आहे. 

Railway Recruitment 2018: Railways RPF vacancy notification out for 9739 vacancies | Railway Recruitment 2018 : रेल्वेत बंपर भरती, पाहा काय आहे अट आणि पात्रता?

Railway Recruitment 2018 : रेल्वेत बंपर भरती, पाहा काय आहे अट आणि पात्रता?

Next

नवी दिल्ली -  भारतीय रेल्वेने जवळपास  भरतीसाठीची प्रक्रिया सुरू केली आहे.  एनडीए सरकार नोकरीच्या संधी निर्माण करण्यात अयशस्वी ठरल्याची टीका सतत विरोधकांकडून सरकारवर होते आहे  रेल्वेने आरपीएफ/आरपीएसएफमध्ये 9,739 पदांसाठी भर्ती काढली आहे. यामधील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. 1 जून पासून ही भर्ती प्रक्रिया सुरु होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जून, 2018 आहे. 

रेल्वेमध्ये सुरक्षेच्या संबधित जवळपास 1 लाख 20 हजार जागा रिकाम्या आहेत. जास्तीत जास्त ग्राऊंड लेवल वर्कफोर्स भरती करून रेल्वे सेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. 'रेल्वेतील ही मेगा भरती गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होतील. रेल्वेत दरवर्षी 40 ते 45 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. रेल्वे सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी सरकारला जवळपास 4 करोड रूपये अतिरिक्त खर्च करावा लागतो. 
 

सब-इंस्पेक्टर (एग्जीक्यूटीव)

  • शैक्षणिक पात्रता : ग्रॅज्यूएशन
  • वय - 20 ते 25 वर्ष

सब-इंस्पेक्टर (बँड)

  • शैक्षणिक पात्रता - बँड मास्टरचा कोर्स किंवा त्यासंबंधित डिग्री
  • वय - 20 ते 25 वर्ष
  • कॉन्सटेबल (एग्जीक्यूटीव)
  • शैक्षणिक पात्रता - 10 वी पास
  • वय मर्यादा - 18 ते 25 वर्ष

कॉन्सटेबल (बँड):

  • शैक्षणिक पात्रता - आरपीएफ नियमानुसार कमीत कमी 2 वर्षांचा म्यूजिकल इंस्ट्रूमेंट्चा अनुभव
  • वय मर्यादा - 18 ते 25 वर्ष

 

ड्राईव्हर ग्रेड-III

  • शैक्षणिक पात्रता - 10 वी पास, ड्राइविंग लायसेंस 6 महिने आधीचं
  • वय मर्यादा - 20 ते 25 वर्ष 

 

निवड प्रक्रिया

  • शारिरीक चाचणी
  •  रिटन टेस्ट 
  • डॉक्यूमेंट्स वेरिफिकेशन

पगार 
ग्रेड पे 2,000 सह 5,200-20,200 रुपये प्रतिमहिना

असा करा अर्ज

  • भारतीय रेल्वेच्या ऑफिशियल वेबसाईट indianrailways.gov.in वर लॉगइन करा.
  • होमपेजवर रिक्रूटमेंटवर क्लिक करा.
  • फॉर्म संपूर्ण भरा. त्यानंतर फी भरा.
  • आरपीएफ रिक्रूटमेंट फॉर्म खालील पत्यावर पाठवा
  • चीफ सिक्योरिटी कमिश्नर, नॉर्थ-ईस्टर्न रेल्वे आणि को-कोर्डिनेटिंग नोडल चीफ सिक्योरिटी ऑफीसर, गोरखपूर

 

Web Title: Railway Recruitment 2018: Railways RPF vacancy notification out for 9739 vacancies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.