JOB Alert : खूशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:36 PM2021-03-30T15:36:16+5:302021-03-30T15:36:35+5:30

Railway Recruitment 2021 : भारतीय रेल्वेअंतर्गत पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

Railway Recruitment 2021 wcr apprentice 716 vacancies apply online wcr indian railways gov in lbse | JOB Alert : खूशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज? 

JOB Alert : खूशखबर! 10 वी पास असणाऱ्यांसाठी रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; जाणून घ्या, कसा अन् कधी करायचा अर्ज? 

Next

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय रेल्वेअंतर्गत (Indian Railways) पश्चिम मध्य रेल्वेने (WCR) विविध अ‍ॅप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. 30 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 716 रिक्त पदे भरती केली जाणार आहे. 

WCR अ‍ॅप्रेंटिस भरती 2021 रिक्त पदांचा तपशील

इलेक्ट्रिशियन – 135 पदे
फिटर – 102 पदे
वेल्डर (इलेक्ट्रिक अँड गॅस) – 43 पदे
पेंटर (सर्वसाधारण) – 75 पदे
मेसन – 61 पदे
कारपेंटर -73 पदे
प्लम्बर – 58 पदे
ब्लॅक स्मिथ – 63 पदे
वायरमन – 50 पदे
संगणक प्रोग्रामिंग व प्रोग्रामिंग सहाय्यक – 10 पदे
मशिनीस्ट– 5 पदे
टर्नर – 2 पदे
लॅब सहाय्यक – 2 पदे
क्रेन सहाय्यक – 2 पदे
ड्राफ्ट्समन – 5 पदे

डब्ल्यूसीआर अ‍ॅप्रेंटिस भरती 2021 शैक्षणिक पात्रता

उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून दहावी पास किंवा संबंधित व्यापारातील आयटीआय प्रमाणपत्र बरोबर असणे आवश्यक आहे.

डब्ल्यूसीआर अ‍ॅप्रेंटिस भरती 2021 वयोमर्यादा 

15 ते 24 वर्षे (वयानुसार सवलत आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना शासकीय निकषांनुसार असेल)

डब्ल्यूसीआर अ‍ॅप्रेंटिस भरती 2021 साठी कसा करावा अर्ज 

इच्छुक उमेदवार 9 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवार भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंटआऊट घेऊ शकतात.

Web Title: Railway Recruitment 2021 wcr apprentice 716 vacancies apply online wcr indian railways gov in lbse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.