Railway Recruitment 2022: दहावी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, २५ हजारांपर्यंत पगार, अशा आहेत अटीशर्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 03:23 PM2022-01-22T15:23:13+5:302022-01-22T15:37:27+5:30
Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वे नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेंतर्गत गेटमनच्या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत.
नवी दिल्ली - भारतीय रेल्वेनोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेने उत्तर पूर्व रेल्वेंतर्गत गेटमनच्या पदावर भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार जे या पदांवरील नोकरीसाठी अर्ज करू इच्छितात, ते भारतीय रेल्वेच्या http://ner.indianrailways.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांवर अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही २० फेब्रुवारी २०२२ आहे.
याशिवाय इच्छुक आणि पात्र उमेदवार थेट https://ner.indianrailways.gov.in/view या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी अर्ज करता येईल. तसेच https://ner.indianrailways.gov.in/uploads/files/1641877685439-ESM या लिंकच्या माध्यमातून तुम्ही रेल्वे भरतीसाठीचे अधिकृत नोटिफिकेशन पाहू शकता. या भरती प्रक्रियेंतर्गत 323 पदे भरली जातील. यामधील १८८ पदे ही लखनौ केंद्रासाठी आणि १३५ पदे ही इज्जतनगर केंद्रासाठी आहेत.
या भरती प्रक्रियेसाठीच्या महत्त्वपूर्ण तारखा पुढीलप्रमाणे आहेत.
- अॉनलाईन अर्ज करण्याची सुरुवात ११ जानेवारी
- अॉनलाईन अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख २० फेब्रुवारी
रेल्वे भरती २०२२ साठी रिक्त पदांचे विवरण
गेटमन - एकूण पदे ३२३
लखनौ - १८८
इज्जतनगर - १३५
या भरती प्रक्रियेसाठीची पात्रता आणि अटीशर्ती पुढीलप्रमाणे आहेत.
- इच्छुक उमेदवार हा कुठल्याही मान्यताप्राप्त बोर्डाकडून दहावी उत्तीर्ण असावा
- निवड झालेल्या उमेदवाराला १८ ते २५ हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाईल.