रेल्वेने एअरटेलला नाकारले, जिओला स्वीकारले...बिलात 35 टक्क्यांची कपात होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 03:25 PM2018-11-22T15:25:50+5:302018-11-22T17:21:42+5:30
ल्वे कर्मचाऱ्यांना कार्पोरेटसारखी सुविधा पुरविणाऱ्या एअरटेलचा करार रेल्वेने संपुष्टात आणला आहे.
नवी दिल्ली : रेल्वे कर्मचाऱ्यांना कार्पोरेटसारखी सुविधा पुरविणाऱ्या एअरटेलचा करार रेल्वेने संपुष्टात आणला असून कमी किंमतीत सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओला मान्यता दिली आहे. यामुळे येत्या 1 जानेवारीपासून रेल्वे कर्मचारी जिओची सेवा वापरणार असून यामुळे रेल्वेचे 35 टक्के बिल कमी येणार असल्याचा अंदाज आहे. रेल्वे अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या फोनचे बिल रेल्वेच भरत असते.
रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना क्लोज्ड युजर ग्रुप (सीयुजी) मध्ये कनेक्शन देण्यात येते. गेल्या 6 वर्षांपासून भारतीय रेल्वेलाएअरटेल सेवा पुरवत होते. यासाठी रेल्वे 100 कोटींचे बिल दरवर्षी एअरटेलला देत होती. हे कंत्राट 31 डिसेंबरला संपत आहे. यामुळे रेल्वेने रिलायन्स जिओला पुढील ठेका दिला आहे.
महत्वाचा भाग म्हणजे जिओची सेवा एअरटेलपेक्षा 1.83 लाख अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. भारती एअरटेल रेल्वेच्या 1.95 लाख लोकांना सेवा देत होते. तर जिओ 3.78 लाख कर्मचाऱ्यांना सीयुजी सेवा देणार आहे. शिवाय जिओ हायस्पीड इंटरनेट आणि अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सेवा पुरविणार आहे. दिवसाचा डेटा संपल्यास 10 रुपयांत 2 जीबी डेटा वाढवून मिळणार आहे.