रेल्वेच्या महसुलात १२.५७ टक्के वाढ

By admin | Published: January 7, 2015 11:36 PM2015-01-07T23:36:45+5:302015-01-07T23:36:45+5:30

एप्रिल ते डिसेंबर २०१४ या कालावधीदरम्यान भारतीय रेल्वेला १,१४,६५६.१३ कोटी रुपयांची कमाई झाली.

Railway revenue increased by 12.57 percent | रेल्वेच्या महसुलात १२.५७ टक्के वाढ

रेल्वेच्या महसुलात १२.५७ टक्के वाढ

Next

नवी दिल्ली : एप्रिल ते डिसेंबर २०१४ या कालावधीदरम्यान भारतीय रेल्वेला १,१४,६५६.१३ कोटी रुपयांची कमाई झाली. मागच्या वर्षात याच अवधीत रेल्वेला १,०१,८५६.४५ कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्या तुलनेत रेल्वेच्या महसुलात १२.५७ टक्के वाढ झाली आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०१४ यादरम्यान रेल्वेला माल वाहतुकीतून ७७,१६१.५५ कोटी रुपये मिळाले. यामागच्या वर्षी याच अवधीत माल वाहतुकीतून ६८,७७६.३५ कोटी रुपये मिळाले होते.
या नऊ महिन्यात प्रवास भाड्यातून रेल्वेला ३१,९५५.०७ कोटी रुपयांची कमाई झाली होती. मागच्या वर्षातील या अवधीच्या तुलनेत रेल्वेला १५.५९ टक्के अधिक कमाई झाली आहे. बुकिंग करणाऱ्या प्रवाशांची संख्या या अवधीत ६,२५६.१६ दशलक्ष होती.
पुढील महिन्यात रेल्वेचा यंदाचा अंर्थसंकल्प मांडला जाणार आहे. त्यादृष्टीने ही वाढ महत्त्वाची आहे.

Web Title: Railway revenue increased by 12.57 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.