राज्याच्या मागास भागात धावणार रेल्वे

By admin | Published: April 20, 2015 01:41 AM2015-04-20T01:41:34+5:302015-04-20T13:02:16+5:30

महाराष्ट्राच्या गडचिरोलीसह अन्य अविकसित भागात रेल्वेच्या जाळ्याचा विकास आणि प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच महाराष्ट्र शासनासोबत करार करणार आहे

Railway runs in backward areas of the state | राज्याच्या मागास भागात धावणार रेल्वे

राज्याच्या मागास भागात धावणार रेल्वे

Next

राज्यशासनासोबत करार : मुख्यमंत्र्यांनी दिला वर्धा-यवतमाळ-नांदेडचा प्रस्ताव
नागपूर : महाराष्ट्राच्या गडचिरोलीसह अन्य अविकसित भागात रेल्वेच्या जाळ्याचा विकास आणि प्रसार करण्यासाठी भारतीय रेल्वे लवकरच महाराष्ट्र शासनासोबत करार करणार आहे.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज सांगितले की, महाराष्ट्रावर केंद्रित या योजनेला साकार करण्यासाठी एका नव्या कंपनीचे गठन करण्यात येणार आहे. प्रभू म्हणाले, आगामी काही दिवसात आम्ही महाराष्ट्र शासनासोबत एका कंपनीची स्थापना करणार आहोत. ही कंपनी राज्यातील विविध भागातील रेल्वे लाईनचा विकास करेल. हा करार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करून हा करार १० दिवसाच्या आत करण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रभू म्हणाले, रेल्वेजवळ आर्थिक तरतुदीचा तुटवडा नाही. मंत्रालयाच्या निधी गोळा करण्याच्या नव्या पद्धतीनुसार रेल्वेत ८.५० ट्रिलियनपेक्षा अधिक रुपयांची गुंतवणुक करण्यात येईल. रेल्वे प्रदीर्घ कालावधीच्या वित्त व्यवस्थापनासाठी जीवन विमा महामंडळाशिवाय इतर एजन्सीच्या संपर्कात आहे.
...........
रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची नजर
१ नक्षल प्रभावित गडचिरोली जिल्हा
२ कोल्हापूर-वैभववाडी मार्ग
३ कराड-चिपळूण मार्ग

मुख्यमंत्री फडणवीस यांची सूचना
१ वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग
२ अहमदनगर-बीड रेल्वेमार्ग
............
नागपुरात मल्टी मॉडेल हब
लॉजिस्टीक कार्पोरेशन ऑफ इंडियाचे गठन करण्याची घोषणा करणार्‍या सुरेश प्रभू यांनी सांगितले की, केंद्रस्थानी असल्यामुळे सरकार नागपूरमध्ये मल्टी मॉडेल हब स्थापन करण्याचा विचार करीत आहे.

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराचे स्वागत- विजय दर्डा
नागपूर- वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी घेतलेल्या पुढाकाराचे खासदार विजय दर्डा यांनी स्वागत केले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला. या निर्णयामुळे विदर्भाच्या विकासाला चालना मिळेल. शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्‘ाच्या विकासाची दालने उघडतील, असे खासदार विजय दर्डा यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, खासदार दर्डा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळाली. तत्कालीन रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या हस्ते २००९ साली यवतमाळात या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प जलद गतीने मार्गी लागावा, यासाठी खासदार विजय दर्डा यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री रामविलास पासवान, मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी पत्रव्यवहार केला. केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस सरकार आल्यानंतरही त्यांनी आपला पाठपुरावा कायम ठेवला. फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत तर १६ मार्च रोजी दिल्ली येथे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वेमार्गाचा प्रश्न लावून धरला होता. दरम्यान, रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सदर प्रकल्पाला गती देण्याचे ठोस आश्वासन दिले होते, हे विशेष.
पंतप्रधान मोदींनीही दिले होते आश्वासन
खासदार विजय दर्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही या प्रकल्पाकडे लक्ष वेधले होते. भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पाकडे स्वत: लक्ष घालून हा प्रकल्प फास्ट ट्रॅकवर ठेवण्याचे आश्वासन खासदार दर्डा यांना दिले होते.

Web Title: Railway runs in backward areas of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.