Knowledge: रेल्वे स्टेशनची नावं नेहमी पिवळ्या बोर्डावर का रंगवली जातात? खूप रंजक आहे यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 10:07 PM2022-01-27T22:07:35+5:302022-01-27T22:08:48+5:30
Indian Railway Signboard: तुम्ही रेल्वेमधून नियमित प्रवास करत असाल तर सर्वच रेल्वे स्टेशनचे नाव हे नेहमी पिवळ्या रंगाच्या बोर्डावर रंगवलेली पाहिली असतील. मात्र जवळपास सर्वंच रेल्वे स्टेशनची नावं ही पिवळ्या रंगाच्या साईन बोर्डवर का लिहिली जातात, याचा विचार कधी तुम्ही केलाय का? आज आम्ही यामागचं कारण तुम्हाला सांगणार आहोत.
नवी दिल्ली - भारतीय रेल्वे जगातील चौथी आणि आशियामधील दुसरी सर्वात मोठी रेल्वे आहे. भारतीय रेल्वेमधून दररोज कोट्यवधी लोक प्रवास करत असतात. तसेच देशातील एकूण रेल्वे स्टेशनची संख्या ही ७ हजार ३४९ एवढी आहे. जर तुम्ही रेल्वेमधून नियमित प्रवास करत असाल तर सर्वच रेल्वे स्टेशनचे नाव हे नेहमी पिवळ्या रंगाच्या बोर्डावर रंगवलेली पाहिली असतील. मात्र जवळपास सर्वंच रेल्वे स्टेशनची नावं ही पिवळ्या रंगाच्या साईन बोर्डवर का लिहिली जातात, याचा विचार कधी तुम्ही केलाय का? आज आम्ही यामागचं कारण तुम्हाला सांगणार आहोत.
पिवळा रंग हा मुख्यत्वेकरून सूर्याच्या प्रकाशाचा रंगावर आधारित आहे. पिवळ्या रंगाचे थेट कनेक्शन हे आनंद, बुद्धी आणि उर्जेशी आहे. गर्दीच्या भागात पिवळ्या रंगाचे बॅकग्राऊंड इतर रंगांच्या तुलनेत खूप चांगले काम करते. तसेच पिवळ्या रंगाच्या बॅकग्राऊंडवर काळ्या रंगाने लिहिलेली अक्षरे ठळक दिसतात. तसेच ती लांबवरूनही पाहता येतात.
त्याशिवाय पिवळा रंग हा खूप चमकदार असतो. तो ट्रेनच्या ड्रायव्हरला लांबवरून दिसतो. तसेच पिवळा रंग हा थांबण्याचा संकेतही देतो. पिवळ्या रंगाचा बोर्ड ट्रेनच्या लोको पायलटला वेग कमी करण्याचा वा सतर्क राहण्याचा संकेत देतो. अनेक रेल्वे स्टेशनवर ट्रेन थांबत नाही. अशा ट्रेनचे लोको पायलट स्टेशनमध्ये प्रवेश करण्यापासून बाहेर पडेपर्यंत खूप सतर्क राहतात. तसेच सातत्याने हॉर्न वाजवतात. त्यामुळे तिथे असलेल्या प्रवाशांना सतर्कतेचा इशारा मिळतो.
लाल रंगानंतर पिवळ्या रंगाची वेवलेंथ अधिक असते. त्यामुळेच स्कूलबस ह्या पिवळ्या रंगाने रंगवल्या जातात. एवढेच नाही. तर पिवळा रंग हा पाऊस आणि धुक्यामध्येही ओळखता येतो. पिवळ्या रंगाचे लेटरहेड पेरिफेरल व्हिजन सुमारे सव्वापट अधिक असते.
याशिवाय धोक्याबाबत सांगण्यासाठी लाल रंगाच्या बॅकग्राऊंड असलेल्या साईन बोर्डवर पांढऱ्या रंगासह पिवळ्या रंगाने लिहिले जाते. लाल रंगामध्ये तीव्रता असते. त्यामुळे धोका दूरवरून ओळखता येतो. रस्त्यांशिवाय रेल्वे वाहतुकीमध्येही लाल रंगाचा चांगल्या पद्धतीने वापर होतो. त्याशिवाय गाडीच्या मागेही लाल रंगाची लाईट लावली जाते. त्यामुळे मागून येणाऱ्या इतर वाहनांना रेल्वे लांबून दिसते.