चिमुकल्याला रुळावर ठेवून महिलेची मालगाडीसमोर उडी, तितक्यात पोलिसांची एंट्री अन्...

By सायली शिर्के | Published: September 28, 2020 07:21 PM2020-09-28T19:21:29+5:302020-09-28T19:28:31+5:30

महिलेने आपल्या बाळासह मालगाडीसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी नेमकं रेल्वे पोलिसांनी पाहिलं आणि तत्परतेने या दोघांचा जीव वाचवला आहे. 

railway track 3 month baby lady jump in front of maalgadi constable saved her life | चिमुकल्याला रुळावर ठेवून महिलेची मालगाडीसमोर उडी, तितक्यात पोलिसांची एंट्री अन्...

चिमुकल्याला रुळावर ठेवून महिलेची मालगाडीसमोर उडी, तितक्यात पोलिसांची एंट्री अन्...

Next

नवी दिल्ली - कोरोनाच्या संकटात देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या फिरोजाबादमध्ये घडली आहे. एका महिलेने 3 महिन्यांच्या बाळाला रुळावर ठेवून मालगाडीसमोर उडी मारली पण रेल्वेपोलिसांच्या सतर्कतेमुळे या दोघांचाही जीव वाचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या बाळासह मालगाडीसमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र याच वेळी नेमकं रेल्वेपोलिसांनी पाहिलं आणि तत्परतेने या दोघांचा जीव वाचवला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेला मालगाडीसमोर धावताना पाहिल्यावर राघवेंद्र आणि योगेंद्र या रेल्वे पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तिला वाचवण्यासाठी धाव घेतली आणि त्यांचा जीव वाचवला. यामध्ये महिला जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर बाळ सुरक्षित आहे. फिरोजाबाद रेल्वे स्थानकात ही घटना घडली. प्रसंगावधान राखून महिलेला आणि बाळाला वाचवणाऱ्या दोन्ही रेल्वे पोलिसांना सन्मानित करण्यात येणार आहे.

महिलेला आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला वाचवणाऱ्या रेल्वे पोलिसांचे सर्वत्र कौतुक 

महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने या घटनेची माहिती देण्यात आली असून रुग्णालयात बोलावून घेण्यात आले. महिला काही कारणांमुळे नाराज झाली होती आणि त्यामुळेच रागावून घरातून बाहेर निघाल्याची माहिती तिच्या पतीने दिली आहे. महिलेला आणि तिच्या तीन महिन्यांच्या बाळाला वाचवणाऱ्या रेल्वेच्या दोन्ही पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलीस अधीक्षक मोहम्मद मुश्ताक यांनी रेल्वेतर्फे पोलिसांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

लय भारी! शिक्षणमंत्र्यांकडून टॉपर्सना 'कार' गिफ्ट, विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचाही करणार खर्च

झारखंडच्याशिक्षणमंत्र्यांनी मात्र टॉपर्सना मोठं गिफ्ट दिलं आहे. झारखंडमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांमध्ये टॉपर्स असलेल्या दोन विद्यार्थ्यांना बक्षिस म्हणून कार देण्यात आली आहे. झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांना कार भेट देण्यात आली. विशेष म्हणजे कारसोबतच  शिक्षणमंत्री जगरनाथ महतो या विद्यार्थ्यांच्या पुढच्या शिक्षणाचा देखील खर्च करणार आहेत. मनीष कुमार कटियार आणि अमित कुमार अशी टॉपर असलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. निकाल जाहीर झाला त्यावेळी शिक्षणमंत्र्यांनी टॉपर्सना बक्षिस म्हणून कार देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांचा बुधवारी सत्कार करण्यात आला आणि कारच्या चाव्या देण्यात आल्या आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : भारीच! N95 मास्क पुन्हा वापरता येणार, शास्त्रज्ञांचा दावा; जाणून घ्या कसं?

CoronaVirus News : "मास्क न घालणारे किलर, मुंबईतील 2 टक्के लोक कळत-नकळत इतरांना मारण्याचं करताहेत काम"

"कृषी कायदे शेतकऱ्यांसाठी फाशीची शिक्षा, भारतातील लोकशाही मरण पावल्याचा हा घ्या पुरावा"

CoronaVirus News : बापरे! 'या' लोकांमुळे देशात पसरला कोरोना; IIT रिसर्चमधून मोठा खुलासा

कृषी विधेयकांविरोधात शेतकरी आक्रमक, ट्रॅक्टर पेटवून व्यक्त केला निषेध; Video व्हायरल

Web Title: railway track 3 month baby lady jump in front of maalgadi constable saved her life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.