रेल्वेत दर दोन तासांनी देणार ताजे खाद्यपदार्थ
By admin | Published: March 22, 2017 02:47 AM2017-03-22T02:47:29+5:302017-03-22T02:47:29+5:30
रेल्वेच्या नव्या ‘कॅटरिंग’ धोरणात खाद्यपदार्थ तयार करणे आणि त्यांचे वितरण व विक्री असे दोन स्वतंत्र भाग करण्यात आल्याने गाड्यांमध्ये प्रवाशांना दर दोन तासांनी ताजे खाद्यपदार्थ पुरविणे शक्य
नवी दिल्ली : रेल्वेच्या नव्या ‘कॅटरिंग’ धोरणात खाद्यपदार्थ तयार करणे आणि त्यांचे वितरण व विक्री असे दोन स्वतंत्र भाग करण्यात आल्याने गाड्यांमध्ये प्रवाशांना दर दोन तासांनी ताजे खाद्यपदार्थ पुरविणे शक्य होईल,असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी येथे सांगितले.
त्यासाठी प्रमुख रेल्वे स्थानके असलेल्या ठराविक अंतरांवरील शहरांमध्ये ‘बेस किचन’ सुरू केली जातील. तेथे खाद्यपदार्थ तयार करून ते रेल्वेगाड्यांमध्ये पुरविले जातील. अशी ‘बेस किचन’ चालविण्यासाठी खासगी कॅटरिंग व्यावसायिकांनी पुढे यावे, असे त्यांनी आवाहन केले. बेस किचनधील खाद्यपदार्थ रेल्वेगाड्यांमध्ये पोहोचविण्याच्या
कामातही खासगी उद्योग सहभागी होऊ शकतील.देशभरात रोज काही हजार लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या धावत असतात व त्यातून प्रवास करणाऱ्या सुमारे ११ लाख प्रवाशांना रेल्वेची खान-पान सेवा जेवण व नाश्ता पुरविते. रेल्वेत मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाविषयी नेहमीच तक्रारी येत असतात हे मान्य करून प्रभू म्हणाले की, आता आम्ही नवे कॅटरिंग धोरण आखले आहे. त्याची अंमलबजावणी कशी करायची यावर मंथन करून आणखी सुधारणा केल्या जातील. (लोकमत न्यूज नेटवर्क)
खानपान सेवेचे दरपत्रक
खानपान सेवा पुरविणारे कंत्राटदार जास्त पैसे उकळत असल्याच्या आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने रेल्वेतील खाद्यपेयांचे दरपत्रक टिष्ट्वटरवर जाहीर केले. प्रवाशांनी याहून जास्त पैसे देऊ नयेत, बिल अवश्य मागून घ्यावे व पैसे जास्त घेतल्यास लगेच तक्रार करावी, असे आवाहनही रेल्वेने केले आहे.
रेल्वेने जाहीर केलेले दरपत्रक
१. कॉफी/चहा
(१५0 मि.लि.) ७ रु.
२. बाटलीबंद पिण्याचे पाणी (१ लिटर) १५ रु.
३. शाकाहारी नाश्ता ३0 रु.
४. मांसाहारी नाश्ता ३५ रु.
५. शाकाहारी भोजन ५0 रु.
६. मांसाहारी भोजन ५५ रु.