रेल्वेची ‘अंत्योदय एक्स्प्रेस’
By admin | Published: August 18, 2016 05:36 AM2016-08-18T05:36:12+5:302016-08-18T05:36:12+5:30
दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाही देशभर परवडणाऱ्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यास भारतीय रेल्वे लवकरच ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ नावाची
बडोदे : दारिद्र्य रेषेखालील नागरिकांनाही देशभर परवडणाऱ्या प्रवासाची सोय उपलब्ध करून देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यास भारतीय रेल्वे लवकरच ‘अंत्योदय एक्स्प्रेस’ नावाची रेल्वेसेवा सुरू करणार आहे.
येथील ‘नॅशनल अॅकॅडमी आॅफ इंडियन रेल्वेज’मध्ये शिक्षण घेणाऱ्या रेल्वे अधिकाऱ्यांना महाराज सयाजी विद्यापीठाची ‘एमबीए’ पदवी देण्यासाठी या दोन संस्थांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या वेळी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ‘अंत्योदय एक्स्प्रेस’सह चार नव्या गाड्या काही महिन्यांत सुरू करण्याची घोषणा केली. (वृत्तसंस्था)
या नव्या रेल्वेगाड्या
- अंत्योदय एक्स्प्रेस : गर्दीच्या मार्गांवर धावणारी अनारक्षित सुपर फास्ट गाडी.
- हमसफर : सर्व डबे थर्ड एसीचे असलेली ‘तेजस’ वर्गातील गाडी. वेग ताशी १३० किमी. स्थानिक खाद्यपदार्थ, वाय-फाय.
- उदय : (उत्कृष्ट डबल डेकर एअर कन्डिशन्ड यात्री). गर्दीच्या मार्गांवर दोन शहरांमधील अंतर रात्रीत कापणारी गाडी.
- दीन दयालू : काही लांब पल्ल्याच्या गाड्यांना जोडणार अनारक्षित ‘दीन दयालू’ डबे. अधिक प्रवाशांसाठी सोय.