दिवाळीसाठी प्रवाशांना रेल्वेकडून खास भेट, 'या' ट्रेनने प्रवास केल्यास मिळणार सूट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 11:54 AM2018-11-01T11:54:31+5:302018-11-01T12:08:57+5:30
रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण दिवाळीसाठी प्रवाशांना रेल्वेकडून खास भेट देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एक खूशखबर आहे. कारण दिवाळीसाठी प्रवाशांना रेल्वेकडून खास भेट देण्यात आली आहे. रेल्वेने काही ट्रेनवरील फ्लेक्सी फेअर योजना हटवली आहे. तर काही ट्रेनच्या तिकिटाच्या रकमेत सूट देऊन प्रवाशांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. रेल्वेच्या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
त्यौहार पर रेल यात्रियों के लिए सरकार का तोहफा: रेलवे ने फ्लेक्सी फेयर के मूल को अधिकतम 1.5 गुना से घटाकर 1.4 गुना करने का फैसला किया है, साथ ही 50% से कम बुकिंग होने वाली ट्रेनों पर फ्लेक्सी फेयर को पूरी तरह से हटा दिया जाएगा। pic.twitter.com/5XuCeDKbS6
— Piyush Goyal (@PiyushGoyal) October 31, 2018
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी बुधवारी (31 ऑक्टोबर) रेल्वेने फ्लेक्सी फेअरचे दर 1.5 टक्क्यांऐवजी 1.4 टक्के केल्याची माहिती दिली. तसेच 50 टक्क्यांहून कमी बुकिंग होणाऱ्या ट्रेन वरील फ्लेक्सी फेअरची योजना समाप्त करण्यात आल्याचंही सांगितलं. म्हणजेच कमी मागणी असणाऱ्या काळात जेव्हा तिकिट बुकिंग 50 ते 75 टक्के घटते. तेव्हा अशा 32 ट्रेनमध्ये फ्लेक्सी योजना लागू केली जाणार नाही.
जुलै महिन्यात आलेल्या कॅगच्या अहवालानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. सप्टेंबर 2016 मध्ये ही योजना सुरू केल्यानंतर अनेक जागा रिकाम्या राहिल्या आहेत. या योजनेत बदल केल्यामुळे जवळपास 103 कोटींचे रेल्वेला नुकसान होणार असल्याचं अहवालामध्ये सांगण्यात आले होते. तिकिटीचा दर कमी केल्यामुळे सीट भरण्यास मदत होईल अशी रेल्वेला आशा आहे.
'या' ट्रेनने प्रवास केल्यास मिळणार सूट
- ट्रेन नंबर : 12006 कालका - नवी दिल्ली शताब्दी
- ट्रेन नंबर : 12012 कालका - नवी दिल्ली शताब्दी
- ट्रेन नंबर : 12037 नवी दिल्ली - लुधियाना शताब्दी
- ट्रेन नंबर : 12038 लुधियाना - नवी दिल्ली शताब्दी
- ट्रेन नंबर : 12043 मोगा (लुधियाना) - नवी दिल्ली शताब्दी
- ट्रेन नंबर : 12044 नवी दिल्ली - मोगा (लुधियाना) शताब्दी
- ट्रेन नंबर : 12047 नवी दिल्ली - भटिंडा शताब्दी
- ट्रेन नंबर : 12048 भटिंडा - नवी दिल्ली शताब्दी
- ट्रेन नंबर : 12085 गुवाहाटी - डिब्रूगड शताब्दी
- ट्रेन नंबर : 12086 डिब्रूगड - गुवाहाटी शताब्दी
- ट्रेन नंबर : 12087 नहरलागुन - गुवाहाटी शताब्दी
- ट्रेन नंबर : 12088 गुवाहाटी - नहरलागुन शताब्दी
- ट्रेन नंबर : 12277 हावडा - पुरी शताब्दी
- ट्रेन नंबर : 22205 चेन्नई - मदुरई दुरंतो
- ट्रेन नंबर : 22206 मदुरई - चेन्नई दुरंतो
भारतीय रेल्वेने यासह अनेक ट्रेनच्या तिकीटावर सूट दिली आहे.