रेल्वेला चीनकडून साह्य

By admin | Published: November 26, 2014 02:33 AM2014-11-26T02:33:59+5:302014-11-26T02:33:59+5:30

दिल्ली ते चेन्नई या 1,754 किमीच्या हायस्पीड रेल्वे मार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी भारतीय रेल्वेचे एक शिष्टमंडळ चीनला पोहोचले आहे.

Railways help China | रेल्वेला चीनकडून साह्य

रेल्वेला चीनकडून साह्य

Next
दिल्ली-चेन्नई बुलेट ट्रेन : भारताचे शिष्टमंडळ चीनला
बीजिंग : दिल्ली ते चेन्नई या 1,754 किमीच्या हायस्पीड रेल्वे मार्गाची व्यवहार्यता तपासण्यासाठी भारतीय रेल्वेचे एक शिष्टमंडळ चीनला पोहोचले आहे. हा मार्ग झाल्यास जगातील दुस:या क्रमांकाचा मोठा बुलेट ट्रेन मार्ग ठरेल. 
एका वरिष्ठ अधिका:याने वृत्तसंस्थेला सांगितले की, सतीश अगिAहोत्री यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे विकास महामंडळाचे काही वरिष्ठ अधिकारी काल बीजिंगला पोहोचले. चीनच्या हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनशी हे अधिकारी चर्चा करतील. दिल्ली-चेन्नई हायस्पीड रेल्वेची व्यवहार्यता या चर्चेत तपासून पाहिली जाईल. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सप्टेंबरमध्ये भारत भेटीवर आले होते. या भेटीत दिल्ली-चेन्नई हायस्पीड रेल्वे मार्गाचा मोफत अभ्यास करण्यावर दोन्ही देशांची सहमती झाली होती. त्यानुसार भारतीय अधिकारी आता चीनला गेले आहेत. चीनमधील बीजिंग-ग्वांग्जू हायस्पीड रेल्वे मार्ग जगातील सर्वात लांब बुलेट ट्रेन मार्ग आहे. त्याची लांबी 2,298 किमी आहे. दिल्ली-चेन्नई बुलेट ट्रेन मार्ग उभा राहिल्यास तो अशा प्रकारचा दुस:या क्रमांकाचा रेल्वेमार्ग ठरेल. चीनमधील ही रेल्वे सेवा गेल्या वर्षी सुरू झाली होती. 
 
च्येथील सरकारी वृत्तपत्र चायना 
डेलीने भारतीय अधिका:यांच्या दौ:याची दखल घेतली आहे. अधिकृत सूत्रंच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, दिल्ली-चेन्नई उच्च गती रेल्वे मार्गावर 32.6 अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. 
 
च्भारत सध्या मुंबई-अहमदाबाद आणि दिल्ली-चेन्नई अशा दोन द्रुतगती रेल्वे मार्गावर विचार करीत आहेत. या दोन्ही मार्गाची व्यवहार्यता तपासण्यात येत आहे. दिल्ली-चेन्नई द्रुतगती रेल्वे मार्गाचे काम पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. 

 

Web Title: Railways help China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.