Coronavirus : रेल्वे कोच बनतायेत रुग्णालय, तयार केले जातायेत 3.2 लाख आयसोलेशन बेड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2020 06:16 PM2020-04-01T18:16:27+5:302020-04-01T18:25:52+5:30
रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे, अशी माहिती, आरोग्य विभागाकजून देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - लॉकडाऊननंतर रेल्वेसेवा ठप्प आहे. त्यामुळे आता रेल्वे विभाग कोरोनाचा सामना करण्यासाठी पूर्णपणे कंबर कसून कामाला लागला आहे. रेल्वे आपल्या एसी आणि नॉन-एसी कोचचे रुपांतर आता आयसोलेशन वार्डमध्ये करत आहे. यासाठी रेल्वे तब्बल 3.2 लाख आयसोलेटेड बेड तयार करत आहे. यासाठी 20 हजार कोचमध्ये आवश्यक ते बदल करण्यात आले आहे, अशी माहिती, आरोग्य विभागाकजून देण्यात आली आहे.
5000 कोचच्या मॉडिफिकेशनचे काम सुरू -
रेल्वेच्या 5000 कोच्या मॉडिफिकेशनचे काम सुरू करण्यात आले आहे. रेल्वे कोचचे रुग्णालयात रुपांतर करण्यासाठी टेस्टिंग किट, मेडिसिन आणि मास्क लाईफ लाईन फ्लाइटच्या माध्यमाने पोहोचवले जात आहेत, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
Railways is preparing to set up 3.2 lakh isolation&quarantine beds by modifying 20000 coaches. Modification of 5000 coaches has begun. Lifeline flights have been started to transport essential commodities like testing kits, medicines & masks: Lav Aggrawal, Union Health Ministry pic.twitter.com/8vW6c8UJIe
— ANI (@ANI) April 1, 2020
रेल्वे बोर्डाच्या सूचनेनुसार पूर्व-मध्य रेल्वेने 208 स्लिपर कोचचे क्वारंटाईन/आयसोलेशन वार्ड तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या 208 कोचमध्ये 1664 बेड अर्थात प्रती कोच 8 बर्थ असतील.
कोरोना महामारी की रोकथाम के लिये भारतीय रेल🚆 अपनी पूरी क्षमता के साथ सहयोग कर रही है। इस वॉयरस से बचाव के लिये रेलवे 3.2 लाख आइसोलेशन बेड🛌 तैयार कर रही है।
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 1, 2020
5,000 कोचेस को मॉडिफाई करने का काम शुरु किया जा चुका है, जिससे 80,000 आइसोलेशन बेड की व्यवस्था होगी। pic.twitter.com/xePT0XbSZS
उपस्थित असेल पॅरामेडिकल स्टॉफ
या रेल्वे वार्डांमध्ये सेविंग ड्रग, उपचार करायची साधने, तपासणी मशिन आणि पॅरामेडिकल स्टाफ तैनात असेल. याशिवाय रुग्णांच्या सोईसाठी कोचमधील एका शोचालयाचे बाथरूममध्ये रुपांतर करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक केबीन मधील मिजल बर्थ काढून घेण्यात येत आहे.
ऑक्सिजन सिलिंडर असती उपलब्ध -
आरोग्य विभागाकडून दोन ऑक्सिजन सिलिंडरही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ते केबिनच्या साइड बर्थवर उपलब्ध असलेल्या जागेवर लावले जातील. या शिवाय खुडक्यांवर मच्छरदानीही लावण्यात येणार आहे. तसेच कोटमधील इन्सुलेशन आणि गर्मी कमी करण्यासाठी कोचच्या वरील भागाला तसेच खिडकीत जवळपास मॅटही लावण्यात येणार आहेत.