Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, दहावी पास उमेदवारांची परीक्षेशिवाय भरती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 10:54 AM2021-03-18T10:54:13+5:302021-03-18T10:56:19+5:30

Railway Recruitment 2021: या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, मेकॅनिक, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशी एकूण 480 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

railways recruitment 2021 north central railway apprentice job vacancy 480 posts sarkari naukri details  | Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, दहावी पास उमेदवारांची परीक्षेशिवाय भरती

Railway Recruitment 2021: रेल्वेत नोकरीची संधी, दहावी पास उमेदवारांची परीक्षेशिवाय भरती

Next
ठळक मुद्देशैक्षणिक पात्रता रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, एखाद्या मान्यताप्राप्त मंडळाकडून 50 टक्के गुणांसह उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा.

North Central Railway Recruitment 2021: रेल्वेमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी अ‍ॅप्रेंटिस म्हणजेच शिकाऊ (Apprentice) पदांवर नोकरीसाठी अर्ज करण्याची चांगली संधी आहे. उत्तर मध्य रेल्वेने (North Central Railway) उत्तर प्रदेशच्या झांसी शहरातील विविध ट्रेड्समध्ये एकूण 480 अप्रेंटिस पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. ज्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 17 मार्च 2021 पासून सुरू झाली आहे.

North Central Railway Vacancy 2021 Details: पदांची माहिती : अधिसूचनेनुसार उत्तर मध्य रेल्वेमध्ये या भरती अंतर्गत फिटर, वेल्डर, मेकॅनिक, कारपेंटर आणि इलेक्ट्रिशियन अशी एकूण 480 पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.

NCR Apprentice 2021: शैक्षणिक पात्रता :  रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या पदासाठी अर्ज करण्यासाठी, एखाद्या मान्यताप्राप्त मंडळाकडून 50 टक्के गुणांसह उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. यासह आयटीआय प्रमाणपत्र संबंधित ट्रेडमधील असावे.

North Central Railway Jobs: वयोमर्यादा : या पदांवर अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे किमान वय 15 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या नियमांनुसार जास्तीत जास्त वयोमर्यादा शिथिल करण्यात येणार आहे.

NCR Apprentice Recruitment: अर्ज फी: अर्जासाठी सर्वसाधारण प्रवर्गाच्या उमेदवारांना 170 रुपये फी भरावी लागेल तर SC/ST आणि महिला उमेदवारांना फक्त 70 रुपये भरावेल लागतील.

North Central Railway Apprentice Selection Process: निवड प्रक्रियाः उत्तर मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिसच्या या पदांवर नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा व मुलाखत देण्याची गरज नाही. मात्र, दहावीच्या गुणवत्ता यादीच्या आधारे त्यांची निवड केली जाणार आहे.

How to Apply For Job: कसा करावा अर्ज? या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पोर्टल mponline.gov.in वर जाऊन रजिस्ट्रेशन करावे लागेल. याशिवाय, उत्तर मध्य रेल्वेच्या ncr.indianrailways.gov.in या वेबसाइटवर भरती विभागात दिलेल्या लिंकला भेट देऊ शकता. 

Web Title: railways recruitment 2021 north central railway apprentice job vacancy 480 posts sarkari naukri details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.