Railways Recruitment 2021: रेल्वे भरतीच्या जागा वाढल्या; लेखी परीक्षाही नाहीय, संधी साधा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2021 03:53 PM2021-02-10T15:53:48+5:302021-02-10T15:56:44+5:30
Railways Recruitment 2021: अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.
Railways Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली होती. याला आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) आणि वेस्ट सेंट्रल रेल्वे (West Central Railway) ने देखील हातभार लावला आहे. आता एकूण ट्रेड अप्रेंटिसच्या 3119 झाल्या आहेत. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. (Railways Recruitment 2021 for 3119 Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)
6 फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.
मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. मध्ये रेल्वेच्य़ा या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे.
राज्य सरकारांना ज्याची धास्ती त्या कॅगमध्ये 10811 पदांवर जंबो भरती; परीक्षा नाही, थेट नियुक्ती
याचबरोबर वेस्ट सेंट्रल रेल्वे (West Central Railway)- 561 पदे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) SPORTS QUOTA- 26 पदे जोडण्यात आली आहे.
नोकरी विषयक अन्य बातम्या पाहण्यासाठी इथे क्लिक करा...
निवड कशी केली जाईल...
10 वी किंवा १२ वीचे मार्क आणि आयटीआयमधील मार्क पकडून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे. यासाठी परीक्षा घेतली जाणार नाही.
अर्ज करण्याच्या तारखाही वेगळ्या...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) च्या पदांवर 23 फेब्रुवारी 2021, वेस्ट सेंट्रल रेल्वेच्या पदांसाठी 27 फेब्रुवारी 2021, तर मध्य रेल्वेला 05 मार्च 2021 अशा अंतिम तारखा आहेत.
SECR Sports Quota Recruitment 2021 इथे क्लिक करा...
CENTRAL RAILWAYS Recruitment 2021 रेल्वे भरतीच्या अधिकृत नोटिससाठी इथे क्लिक करा...
WEST CENTRAL RAILWAYS Recruitment 2021 इथे क्लिक करा...
Bhabha Atomic Research Centre (BARC) Recruitment 2021: भाभा अणुशक्ती संशोधन केंदामध्ये (BARC) नर्स, चालक आणि ट्रेनी व इतर जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांकडून १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज ही मागविण्यात आले आहेत.