2 लाख स्क्रीन्समधून रेल्वे कमावणार 10,000 कोटी
By admin | Published: April 24, 2017 12:35 PM2017-04-24T12:35:10+5:302017-04-24T13:00:56+5:30
भारतीय रेल्वे दिवसेंदिवस कात टाकताना पाहायला मिळत आहे. रेल्वेचं उत्पन्न वाढावं यासाठी रेल्वे मंत्रालय कायम प्रयत्नशील असतं.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - भारतीय रेल्वे दिवसेंदिवस कात टाकताना पाहायला मिळत आहे. रेल्वेचं उत्पन्न वाढावं यासाठी रेल्वे मंत्रालय कायम प्रयत्नशील असतं. थेट परकीय गुंतवणूक मिळावी यासाठीही रेल्वेनं कवाडं खुली केली आहेत. आता देशभरातील रेल्वे स्टेशनांवर 2 लाख स्क्रीन लावण्याचा रेल्वेचा मानस आहे. स्टेशनांवरून लावलेल्या स्क्रीनवरच्या जाहिरातींच्या माध्यमातून 10 वर्षांसाठी 10 हजार कोटी उत्पन्न मिळवण्यासाठी रेल्वे प्रयत्नशील आहे. त्यामुळे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनांना लवकरच डिजिटल स्क्रीन प्राप्त होणार आहे.
या माध्यमातून प्रवाशाला ट्रेनची वास्तविक वेळ आणि राष्ट्रीय ट्रान्सपोर्टसंदर्भात जाहिरातींच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. रेल्वे प्रदर्शन नेटवर्क (RDN)कडे यासाठी महत्त्वाचं व्यासपीठ म्हणून पाहिलं जात आहे. विशेष म्हणजे या प्रोजेक्टचा गुगल हिस्सा होण्यासाठी उत्सुक आहे. तसेच गुगलनं यासाठी जाहिराती तंत्रज्ञान आणि डिझाइन विकसित करण्याची तयारी दर्शवली आहे. मायकोसॉफ्ट आणि रिलायन्सलाही या प्रोजेक्टचा भाग होण्याची आकांक्षा असल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार समजलं आहे. यामुळे दूरदर्शनपेक्षाही सर्वात मोठा जाहिरात मंच निर्माण होण्याचं अपेक्षित असल्याचं एका रेल्वे अधिका-यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं आहे.
रेल्वे प्रदर्शन नेटवर्क (RDN)च्या माध्यमातून सुरुवातील 400 रेल्वे स्टेशनांवर या स्क्रीन लावण्यात येणार आहेत. तसेच यासंदर्भातील टेंडर मेमध्ये निघण्याची शक्यता आहे. मोठ्या आणि छोट्या डिजिटल स्क्रीन या जुनी दिल्ली, गोरखपूर, ग्वालियार आणि वाराणसी संकल्पना पुरावा (PoC) करारावर आधीच बसवण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशभरातील जवळपास 2175 रेल्वे स्टेशनांवर या स्क्रीन बसवण्याचा रेल्वेचा उद्देश आहे