चेन्नईत पुन्हा पाऊस

By admin | Published: December 6, 2015 10:56 PM2015-12-06T22:56:32+5:302015-12-06T22:56:32+5:30

चेन्नईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदाला येत असताना रविवारी शहरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. तथापि विमान, रेल्वे, वीज व संपर्क सेवा सुरू झाल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला.

Rain again in Chennai | चेन्नईत पुन्हा पाऊस

चेन्नईत पुन्हा पाऊस

Next

चेन्नई : चेन्नईतील जनजीवन हळूहळू पूर्वपदाला येत असताना रविवारी शहरात पावसाने पुन्हा हजेरी लावली. तथापि विमान, रेल्वे, वीज व संपर्क सेवा सुरू झाल्यामुळे लोकांना काहीसा दिलासा मिळाला.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजताच्या पहिल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राजधानी चेन्नईत २१.२ मिलिमीटर पाऊस झाला, तर उपनगरीय भागांत २१.० मिलिमीटर पाऊस पडला. विशेष म्हणजे येत्या २४ ते ४८ तासांत तामिळनाडूच्या किनारपट्टीलगतच्या भागांत अतिवृष्टीचा अंदाज असून यात कुड्डलूरचा समावेश आहे.
थांबून थांबून पाऊस सुरू असल्याने अनेक भाग अद्यापही जलमय आहेत. मुदीचूर व उरप्पक्कम यासारख्या भागांमध्ये स्थिती गंभीर आहे. पावसामुळे वाहतूक प्रभावित झाली असली तरी बस आणि रेल्वेसेवा हळूहळू पूर्ववत होत असल्याने लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मोबाईल आणि इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. दरम्यान, चेन्नईतील पूर संकटात आमचे बहुसंख्य नागरिक सुरक्षित आहेत, असे सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी सांगितले.

Web Title: Rain again in Chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.