पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2023 06:54 AM2023-08-19T06:54:04+5:302023-08-19T06:55:40+5:30

१ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

rain claimed 2038 lives highest death in himachal pradesh including bihar many people are missing | पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

पावसाने घेतले २,०३८ बळी; बिहारसह हिमाचल प्रदेशात सर्वाधिक मृत्यू; अनेक जण बेपत्ता

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : देशभरात या पावसाळ्यात पूर, वीज पडणे आणि भूस्खलनामुळे किमान २,०३८ लोकांचा मृत्यू झाला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक ५१८ आणि हिमाचल प्रदेशात ३३० लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी १ एप्रिल ते १७ ऑगस्ट दरम्यान पाऊस आणि पुरामुळे १०१ लोक बेपत्ता झाले आणि १,५८४ जण जखमी झाले आहेत.

कोणत्या राज्याला सर्वाधिक फटका? 

पाऊस, भूस्खलन आणि वीज पडून मध्य प्रदेशातील ४०, आसाममधील ३० आणि उत्तर प्रदेशातील २७ जिल्ह्यांसह देशभरातील ३३५ जिल्ह्यांना फटका बसला आहे. हिमाचल प्रदेशातील १२ जिल्हे आणि उत्तराखंडमधील सात जिल्हेही पावसाळ्यात पूर आणि भूस्खलनाने प्रभावित झाले आहेत.

होतं नव्हतं तेवढं गेलं, हाती राहिला अंधार!

उत्तराखंडमध्ये पावसाने लोकांसमोर आव्हानांचा डोंगर निर्माण केला आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील बैरागढ गावात ढगफुटीनंतर नुकसान झालेल्या भागात घरांभोवती दगड-मातीचे ढिगारे दिसत आहेत. छत्तीसगड सरकारने हिमाचलसाठी ११ कोटी रुपयांची मदत देत असल्याचे जाहीर केले आहे.

पाऊस, पूर, भूस्खलन आणि वीज पडून मृत्यू

गुजरात    १६५ 
मध्य प्रदेश    १३८ 
कर्नाटक    १०७ 
महाराष्ट्र    १०७ 
छत्तीसगड    ९० 
उत्तराखंड    ७५

८९२ लोकांचा बुडून मृत्यू, ५०६  जण वीज पडून मृत्यू, १८६  भूस्खलनामुळे मृत्यू झाला. ४५४ जणांचा इतर कारणांमुळे, १४      
एनडीआरएफ पथके महाराष्ट्रात, १६० राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या टीम विविध राज्यांमध्ये तैनात.

 

Web Title: rain claimed 2038 lives highest death in himachal pradesh including bihar many people are missing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.