पुराचा हाहाकार! आसामवर अस्मानी कहर; ५७ हजार लोकांना फटका, रूळ वाहून गेले, रेल्वे उलटल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 05:31 AM2022-05-17T05:31:04+5:302022-05-17T05:31:39+5:30

देशात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना आसाममध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजविला.

rain havoc in assam 57000 people were hit and tracks damaged trains overturned | पुराचा हाहाकार! आसामवर अस्मानी कहर; ५७ हजार लोकांना फटका, रूळ वाहून गेले, रेल्वे उलटल्या

पुराचा हाहाकार! आसामवर अस्मानी कहर; ५७ हजार लोकांना फटका, रूळ वाहून गेले, रेल्वे उलटल्या

googlenewsNext

गुवाहाटी : देशात एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना आसाममध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. सहा जिल्ह्यांतील ५७ हजार लोकांना या पावसाचा फटका बसला आहे. आतापर्यंत तीन लोकांचा भूस्खलनामुळे मृत्यू झाला आहे. 

परिणाम काय?

त्रिपुरा, मिझोरम व दक्षिण आसामशी जोडलेल्या २५ पेक्षा अधिक रेल्वे भूस्खलनामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. पुराचा सर्वाधिक फटका कछार भागात बसला आहे. दोन जिल्ह्यांतील दहा शिबिरात २२७ लोकांना हलविले आहे. या जिल्ह्यात निमलष्करी दल, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, एसडीआरएफ जवानांनी २२०० लोकांना वाचविले आहे.
 

Web Title: rain havoc in assam 57000 people were hit and tracks damaged trains overturned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.