काय सांगता! घरावर नोटांचा पाऊस, पैसा पाहण्यासाठी लोकांची गर्दी, छतावर संदेशही लिहिला...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 06:07 PM2024-09-08T18:07:40+5:302024-09-08T18:09:35+5:30

अचानक एका रात्री एका घरावर नोटा पडायला सुरूवात झाली. या नोटा पाहून सर्व गावकरी जमले. परिसरात खळबळ उडाली.

Rain of notes on the house, crowd of people to see the money, message written on the roof | काय सांगता! घरावर नोटांचा पाऊस, पैसा पाहण्यासाठी लोकांची गर्दी, छतावर संदेशही लिहिला...

काय सांगता! घरावर नोटांचा पाऊस, पैसा पाहण्यासाठी लोकांची गर्दी, छतावर संदेशही लिहिला...

अचानक एका रात्री एका घरावर नोटा पडायला सुरूवात झाली. या नोटा पाहून सर्व गावकरी जमले. परिसरात खळबळ उडाली. पैशांच्या खाली एक मेसजही लिहिला होता, यात अनोळखीने जीवे मारण्याची धमकी लिहिली होती. हे पैसे पाहण्यासाठी परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पैशांचा साठा जप्त केला. घराच्या छतावरील हे दृश्य पाहून पोलीसही चक्रावले.

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण उत्तर प्रदेशातील प्रयागराजच्या नवाबगंज भागातील बेरवा गावातील आहे. येथे अचानक मोती सिंह नावाच्या व्यक्तीच्या घराच्या छतावर १०० आणि ५० रुपयांच्या नोटांचा ढीगारा पडला.  यासोबतच एक धमकीचा मेसेजही लिहिलेला सापडला, या धमकीत लाल रंगात लिहिले होते- 'अरुण मरेल आणि मोतीही मरेल'. या घटनेची माहिती संपूर्ण गावात पसरली.परिसरातील लोकांनी हे पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली.

ममता बॅनर्जींवर संताप अन् खासदारकीचा दिला राजीनामा! कोण आहेत जवाहर सरकार?

गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील काही लोकांनी या घटनेला चमत्कार असल्याचं म्हणाले तर काहींनी याला मोठ्या गूढ किंवा जादूटोणा असल्याचं म्हणाले. काही लोक ४०-५० किलोमीटरचा प्रवास करून छत पाहण्यासाठी मोती सिंह यांच्या घरी पोहोचले. मोती सिंह यांच्या घराबाहेर गर्दी एवढी वाढली की घरच्यांना दरवाजा बंद करून आत बसावे लागले.  

अफवा वाढत गेल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. नवाबगंज पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता हा कोणाचा तरी खोडसाळपणा असू शकतो. असं पोलिसांनी म्हटले आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तपासात हे दुष्कृत्य असल्याचे समोर आले आहे, मात्र हे कोणी केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना पूर्णपणे दिशाभूल करणारी असून लोकांनी या अफवेकडे लक्ष देऊ नये आणि घराबाहेर गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेबाबत अफवा पसरवू नये आणि अशा गोष्टींकडे लक्ष देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी ग्रामस्थांना केले आहे.

गावकऱ्यांनी काय सांगितलं?

या घटनेमुळे गावकऱ्यांच्यात भिती पसरली आहे. गावकऱ्यांनी सांगितले की, आम्ही असे काही पाहिले नाही. काही लोक याला जादूटोणा असल्याचं म्हणाले. तर काहीजण याला रहस्य मानत आहेत. लोक घाबरले आहेत, पण पोलिसांनी याला कोणाची तरी बदनामी असल्याचे म्हटले आहे. आम्हाला या ठिकाणी पैसा पडत असल्याचे कळाले त्यासाठी आम्ही हे पाहायला आलो होतो. 

Web Title: Rain of notes on the house, crowd of people to see the money, message written on the roof

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.