'नीरी'च्या वैज्ञानिकांचं संशोधन लय भारी; आता रस्त्यातच मुरणार पावसाचं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 02:00 AM2019-11-18T02:00:29+5:302019-11-18T06:19:49+5:30

‘फ्लाय अ‍ॅश’द्वारे काँक्रिटची निर्मिती

The rain water will now die in the road | 'नीरी'च्या वैज्ञानिकांचं संशोधन लय भारी; आता रस्त्यातच मुरणार पावसाचं पाणी

'नीरी'च्या वैज्ञानिकांचं संशोधन लय भारी; आता रस्त्यातच मुरणार पावसाचं पाणी

Next

- निशांत वानखेडे 

नागपूर : रस्त्यावर पडणारे पावसाचे पाणी वाहून न जाता रस्त्यातच शोषले जाऊन झिरपत जमिनीत मुरवण्यासाठी जगभरातील संशोधक प्रयत्न करीत आहेत. अशात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या (नीरी) वैज्ञानिकांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली आहे. वीज प्रकल्पातील राखेपासून (फ्लाय अ‍ॅश) रस्ते निर्मितीसाठी उपयोगी काँक्रिट तयार करण्याचे तंत्रज्ञान नीरीने विकसित केले आहे. यातून मजबूत रस्ते तयार करण्यासोबतच भूगर्भातील जलस्तर वाढेल, असा दावा त्यांनी केला आहे.

कोळशावरील विद्युत प्रकल्पातून निघणारी राख व त्यातून होणारे प्रदूषणाची जीवघेणे ठरत आहेत. ही राख पोरस काँक्रिट म्हणून उपयोगात येऊ शकते का, यावरही संशोधन सुरु आहे. बांधकामाच्या विटा व इतर वस्तू निर्मितीच्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत नव्हते. त्यात सिमेंटसारखी मजबुती येत नव्हती. नीरीचे प्रधान वैज्ञानिक आणि या प्रकल्पाचे संयोजक डॉ. अवनीश अंशुल यांनी या ‘फ्लाय अ‍ॅश बेस्ड हाय स्ट्रेन्थ परवियस काँक्रिट’ विषयी माहिती दिली.

आतापर्यंत फ्लायअ‍ॅशमध्ये अल्कलीच्या मिश्रणाचा प्रयत्न चालला होता. पण अल्कली धोकादायक असल्याने व्यावसायिक वापर शक्य झाला नाही. रस्ते निर्मितीसाठी काँक्रिटची क्षमता ३० मेगापिक्सलपर्यंत असणे आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत ही क्षमता १८ मेगापिक्सलच्यावर आणणे शक्य झाले नाही. मात्र नीरीमध्ये वेगवेगळ्या कंपोनन्टचा उपयोग करून स्मार्ट जीओ पॉलिमर तंत्राने यापेक्षा अधिक क्षमतेचे पोरस काँक्रिट तयार केल्याचे त्यांनी सांगितले.

सात दिवसांत रस्ता उपयोगासाठी तयार
नीरीमध्ये या पोरस काँक्रिटचा वापर करून एक मोठे स्ट्रक्चर तयार करण्यात आले असून ते यशस्वीपणे कार्य करीत असल्याचे डॉ. अंशुल यांनी सांगितले. यात सिमेंटपेक्षा चांगली गुणवत्ता आहे. नवनिर्मितीनंतर सिमेंट रस्त्यांच्या मजबुतीसाठी २८ दिवस वाट पहावी लागते व भरपूर पाणी द्यावे लागते. मात्र फ्लाय अ‍ॅशच्या पोरस काँक्रिटवर पाणी टाकण्याची गरज नाही व सात दिवसांत रस्ता उपयोगासाठी तयार होतो.

Web Title: The rain water will now die in the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.