हैदराबादेत पावसाचा कहर
By admin | Published: September 1, 2016 04:32 AM2016-09-01T04:32:28+5:302016-09-01T04:32:28+5:30
हैैदराबादेत मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे दोन इमारती कोसळून बुधवारी सात जणांना प्राण गमवावे लागले. मृतांत चार बालकांचा समावेश आहे
हैैदराबाद : हैैदराबादेत मुसळधार पाऊस सुरू असून, त्यामुळे दोन इमारती कोसळून बुधवारी सात जणांना प्राण गमवावे लागले. मृतांत चार बालकांचा समावेश आहे. येथील बहुतांश भागात पाणी साचल्यामुळे शहरातील वाहतुकीचेही तीनतेरा झाले आहेत.
पावसामुळे आज सकाळी अनेक भागांत वाहतूक ठप्प होऊन गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. अनेक सखल भाग जलमय झाल्यामुळे लोकांना घरेदारे सोडून इतरत्र आश्रय घ्यावा लागला. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान घोषित केले. बांधकाम सुरू असलेली भिंत झोपडीवर कोसळून एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. मृतांत आईवडील आणि दोन बालकांचा समावेश आहे. दुसऱ्या घटनेत घराचा एक भाग कोसळून एक महिला आणि तिच्या दोन मुलींचा अंत झाला.
मध्यप्रदेशात वीजेचे दोन बळी
मध्यप्रदेशात वीज कोसळून दोन वेगवेगळ््या घटनांत तरुण जोडपे मृत्युमुखी पडले तर इतर सात जण जखमी झाले. या दोन्ही दुर्घटना मंगळवारी रात्री घडल्या. (वृत्तसंस्था)
दोन वाहनांत चिरडून आठ ठार
हैदराबाद येथे कार दोन वाहनांमध्ये चिरडली जाऊन आठ जण ठार झाले. मृतांत सहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शहराजवळील टोलनाक्यावर मंगळवारी मध्यरात्री हा अपघात झाला. भरधाव ट्रकने कारला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे कार रस्त्यावर उभ्या असलेल्या समोरच्या ट्रकवर आदळली आणि आठ जण जागीच मृत्युमुखी पडले. या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला उपचारास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी सहा जण अभियांत्रिकी आणि पदवी महाविद्यालयांचे विद्यार्थी होते. २० ते ३० वर्षे वयोगटातील हे विद्यार्थी एकमेकांचे मित्र होते.