देशात यंदा जोरदार पाऊस, सरासरी ११० टक्के बरसणार

By Admin | Published: June 3, 2016 03:41 AM2016-06-03T03:41:19+5:302016-06-03T03:41:19+5:30

देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान १०४ ते ११० टक्के पाऊस होणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला. यात सर्वाधिक पाऊस मध्य भारतात ११३ टक्के होण्याची

The rainfall this year will be 110 percent average | देशात यंदा जोरदार पाऊस, सरासरी ११० टक्के बरसणार

देशात यंदा जोरदार पाऊस, सरासरी ११० टक्के बरसणार

googlenewsNext

पुणे : देशभरात जून ते सप्टेंबर दरम्यान १०४ ते ११० टक्के पाऊस होणार असल्याचा दुसरा दीर्घकालीन अंदाज हवामान विभागाने गुरुवारी जाहीर केला. यात सर्वाधिक पाऊस मध्य भारतात ११३ टक्के होण्याची शक्यता वर्तवली आहे़ त्यामध्ये ८ टक्के फरक पडू शकतो़ हवामान विभागाने १२ एप्रिलला पहिला अंदाज जाहीर केला होता़ त्यात देशभरात १०६ टक्के पावसाचे संकेत दिले होते़ या दुसऱ्या अंदाजानुसार, उत्तर पश्चिम भारतात १०८ टक्के, मध्य भारत ११३ टक्के, दक्षिण व द्वीपसमूहात ११३ टक्के आणि पूर्वात्तर भारत ९४ टक्के पावसाची शक्यता आहे़ जुलैत संपूर्ण देशभरात १०७ टक्के आणि आॅगस्टमध्ये १०४ टक्के पाऊस होण्याची शक्यता असून, त्यात ९ टक्के इतका कमी-जास्त फरक पडू शकतो. पुण्यातील भारतीय उष्णदेशीय हवामान शास्त्र विभाग (आयआयटीएम), भूविज्ञानशास्त्र मंत्रालयातील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी मॉन्सून मिशन प्रकल्पांतर्गत विकसित केलेल्या
कपल्ड डायनॅमिक मॉडेलच्या साहाय्याने यंदाचा मॉन्सून अंदाज जाहीर केला आहे.

Web Title: The rainfall this year will be 110 percent average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.