पावसामुळे करंट पसरला, एकमेकांना वाचवण्याच्या नादात मायलेकींसह पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 01:57 PM2021-09-01T13:57:30+5:302021-09-01T14:01:11+5:30

Accident News: मुसळधार पावसादरम्यान विजेचा करंट पसरला. यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पाच जणांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला.

The rains caused an electric shock, killing five people, including mother Daughter, who were trying to save each other | पावसामुळे करंट पसरला, एकमेकांना वाचवण्याच्या नादात मायलेकींसह पाच जणांचा मृत्यू

पावसामुळे करंट पसरला, एकमेकांना वाचवण्याच्या नादात मायलेकींसह पाच जणांचा मृत्यू

Next

लखनौ - आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गाझियाबादमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. येथील सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात राकेश मार्ग परिसरात मुसळधार पावसादरम्यान विजेचा करंट पसरला. यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये पाच जणांचा विजेचा जोरदार धक्का बसून मृत्यू झाला. पाच जणांना विजेचा धक्का बसल्यावर आजूबाजूचे लोक त्यांना रुग्णालयात घेऊन गेले. तिथे डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केले. तर काही वेळाने अजून एकाचा मृत्यू झाला. आता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. (The rains caused an electric shock, killing five people, including mother Daughter, who were trying to save each other)

गाझियाबादचे एसपी निपुण अग्रवाल यांनी सांगितले की, सिहानी गेट पोलीस ठाणे क्षेत्रातील राकेश मार्ग परिसरामध्ये पान सिंह पॅलेसजवळ एका घराबाहेर शेड पडली होती. तिला लोखंडाचे खांब लावले होते. पावसामुळे या खांबांमध्ये विद्युत प्रवाह पोहोचला होता. त्यावेळी एकमेकांना वाचवण्याच्या नादात पाच जणांचा जीव गेला.

दरम्यान, आसपासच्या लोकांना गोळा होऊन या सर्वांना एमजीएम जिल्हा रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी चार जणांना मृत घोषित केले. मृतांमध्ये आई आणि मुलींचा समावेश आहे. जानकी, लक्ष्मी आणि दोन मुली सुबी आणि सिमरन या चौघांचा मृत्यू झाला. तर एक अन्य व्यक्ती उपचारांदरम्यान मरण पावली. त्यामुळे मृतांचा आकडा पाचवर पोहोचला. एसपी सिटी यांनी सांगितले की, या लोखंडी खांबांमध्ये विद्युत प्रवाह पोहोचण्यामागच्या कारणांचा तपास केला जात आहे.  

Web Title: The rains caused an electric shock, killing five people, including mother Daughter, who were trying to save each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.