बुलडोझरच्या टायरमध्ये हवा भरताना मोठा स्फोट, दोन जणांचा मृत्यू; अंगावर काटा आणणारा Video
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 01:28 PM2022-05-05T13:28:26+5:302022-05-05T13:29:23+5:30
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन जण जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत असताना झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे.
रायपूर-
छत्तीसगडच्या रायपूरमध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये दोन जण जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरत असताना झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाल्याचं दिसत आहे. व्हिडिओ इतका भयंकर आहे की तो पाहूनच घटनास्थळावर घडलेल्या थरारक प्रसंगाची कल्पना आपण करू शकतो.
रायपूरच्या सफलता फेज-२ येथील घनकुल स्टीलमध्ये जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरण्याचं काम दोन कामगार करत होते. पण यावेळी मोठा स्फोट झाला आणि यात दोनही कामगार फेकले गेले. दुर्घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कामगारांचं नाव राजपाल सिंह आणि प्रांजन नामदेव असल्याची माहिती समोर आली आहे. स्फोट इतका मोठा होता की दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
#CCTV captures a massive explosion taking place while filling air in a JCB tire in #Raipur. Two people died in the incident. #ViralVideo#Viral#viraltwitter#WatchViralVideo#Indiapic.twitter.com/3SpPKir901
— Anjali Choudhury (@AnjaliC16408461) May 5, 2022
व्हिडिओमध्ये एक कामगार जेसीबीच्या टायरवर बसून त्यात मशिनच्या सहाय्यानं हवा भरताना दिसत आहे. तर दुसरा व्यक्ती टायरवर लोखंडी वस्तू मारुन टायरची तपासणी करताना दिसतो. तो तिथून निघून जातो आणि इतक्यात तिसरा व्यक्ती तिथं येऊन टायरमधील हवा तपासण्यासाठी टायरला हात लावतो. तितक्यात टायर फुटतो. जे दोन जण टायरच्या जवळ होते ते स्फोटामुळे बाजूला फेकले गेल्याचं व्हिडिओत दिसून येतं. दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.