भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध, नवा छत्तीसगड बनवणार- अमित शाह
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 03:42 PM2018-11-10T15:42:29+5:302018-11-10T15:43:54+5:30
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जाहीरनाम्याची घोषणा केली आहे.
रायपूर- छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं जाहीरनाम्याची घोषणा केली आहे. या जाहीरनाम्यात भाजपानं नवनव्या घोषणा केल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राजधानी रायपूरमधल्या एका खासगी हॉटेलमधून हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. भाजपानं जाहीरनाम्यात गाव, गरीब आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जोर दिला आहे. तसेच तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असल्याचंही सांगितलं आहे.
यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याबरोबरच डॉ. रमण सिंह, कॅबिनेट मंत्री अमर अग्रवाल, भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री सारोज पांडेयसह भाजपाचे मोठे नेते उपस्थित होते. याच क्षणी शाह म्हणाले, डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वात नव्या छत्तीसगडचे निर्माण करू. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं आहे. नक्षलवाद्यांना क्रांतीचं माध्यम समजणारा पक्ष छत्तीसगडचं काहीही भलं करणार नाही. भाजपा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवून छत्तीसगडमध्ये चौथ्यांदा सत्तेत येईल. आजारी राज्य असलेला छत्तीसगड आता वीज आणि सिमेंट उत्पादनाचं केंद्र झाला आहे, असंही शाह म्हणाले आहेत. तसेच छत्तीसगडचे मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. काँग्रेस शेतक-यांना फक्त व्होट बँक समजते.
Jis party ko naxalwaad mein kranti dikhai padti ho, naxalwaad kranti ka maadhyam dikhai padhta ho, woh party Chhattisgarh ka bhala nahi kar sakti: BJP President Amit Shah in Chhattisgarh's Raipur pic.twitter.com/UJ10d21LED
— ANI (@ANI) November 10, 2018
आमचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास अंबिकापूर आणि जगदलपूरमध्ये मल्टि स्पेशालिटी रुग्णालय बनवणार आहे. तसेच स्मार्ट कार्ड धारकांना 50 हजारांहून 1 लाख रुपये युनिर्व्हसल हेल्थ स्कीमअंतर्गत देण्यात येणार आहेत. तसेच पत्रकार कल्याण बोर्डाची स्थापना केली जाईल. छत्तीसगडमध्ये फिल्म सिटीचं निर्माण करणार आहे. त्याशिवाय या जाहीरनाम्यात इतरही मुद्द्यांचा समावेश आहे.
Chhattisgarh was the first state to have a legislation on skill development: BJP President Amit Shah in Chhattisgarh's Raipur pic.twitter.com/5C4R1fDmnX
— ANI (@ANI) November 10, 2018
शेतक-यांचं आधार मूल्य दीड टक्के वाढवण्यात येणार आहे. छोट्या व्यापा-यांना पाच लाखांपर्यंत विमा संरक्षण देणार आहोत. काँग्रेसनंही काल छत्तीसगड राज्यासाठी घोषणापत्र जाहीर केलं आहे.
Raman Singh government has changed the state in the past 15 years and has been successful in containing Naxalism: BJP President Amit Shah in Chhattisgarh's Raipur pic.twitter.com/Kgzf3FZAzc
— ANI (@ANI) November 10, 2018
शेतकऱ्यांची कर्जमाफी, रोजगार, दारूबंदी, धान्याचं आधार मूल्य 2500 रुपये करणे, बेरोजगारीसह इतर 36 मुद्द्यांचा समावेश आहे. त्यानंतर आज भाजपानं स्वतःचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.
Raipur: BJP President Amit Shah and Chhattisgarh CM Raman Singh release manifesto for Chhattisgarh Assembly elections pic.twitter.com/GvTJHo5LCk
— ANI (@ANI) November 10, 2018