तोकडे कपडे घालणं म्हणजे 'निर्भया'सारख्या घटनांना चालना देणं; शिक्षिकेचा विद्यार्थिनींना अजब सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 10:01 AM2018-01-30T10:01:41+5:302018-01-30T10:02:49+5:30

तोडके कपडे परिधान करणं आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणं निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करतं, असं या शिक्षिकेचं म्हणणं आहे.

raipur kv school teacher said to girl students that revealing cloths incites crime like nirbhaya | तोकडे कपडे घालणं म्हणजे 'निर्भया'सारख्या घटनांना चालना देणं; शिक्षिकेचा विद्यार्थिनींना अजब सल्ला

तोकडे कपडे घालणं म्हणजे 'निर्भया'सारख्या घटनांना चालना देणं; शिक्षिकेचा विद्यार्थिनींना अजब सल्ला

googlenewsNext

रायपूर- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या निर्भया प्रकरणानंतर संपूर्ण देशातून आरोपींना कठोर शिक्षा मिळविण्यासाठी आंदोलन केलं गेलं. निर्भयाला न्याय देण्यासाठी नागरिक रस्त्यावरही उतरले होते. याबहुचर्चीत प्रकरणावर आता छत्तीसगडमधील एका शिक्षिकेने वाद ओढावून घेणारं वक्तव्य केलं आहे. तोडके कपडे परिधान करणं आणि रात्री मुलींनी घराबाहेर फिरणं निर्भया सारख्या सामूहिक बलात्कार प्रकरणांना प्रोत्साहीत करतं, असं या शिक्षिकेचं म्हणणं आहे. इतकंच नाही, तर निर्भया प्रकरणात निर्भयाची कशी चुकी होती, हे विद्यार्थिनींना समजावून सांगण्याचाही त्या शिक्षेकेने पूर्ण प्रयत्न केला आहे. 

रायपूरच्या केंद्रीय विद्यालयातील बायोलॉजीच्या शिक्षिकेने तिच्या वर्गाला काऊंन्सिलिंग सेशनमध्ये बदलून मुलांसमोर मुलींना हा अजब सल्ला दिला आहे. अंगप्रदर्शन करणारे कपडे निर्भया प्रकरण घडायला चालना देतात. ज्या मुली रात्री बाहेर फिरतात त्यांच्याबरोबर अशा घटना घडू शकतात, असं या शिक्षिकेने म्हंटलं. दरम्यान, शिक्षिकेच्या या वक्तव्याने चिडलेल्या एका विद्यार्थीनीच्या वडिलांनी शाळेचे मुख्याध्यापक भगवान दास अहीर यांना भेटून शिक्षिका स्नेहलता शंखवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

मुलींच्या जिन्स पॅण्ट घालण्यावर व लिपस्टिक लावण्यावरही या शिक्षिकेने आक्षेप घेतला आहे. दरम्यान तक्रारीमध्ये शिक्षिकेच्या वक्तव्यांची ऑडिओ क्लिपही देण्यात आली आहे. मुली जेव्हा सुंदर नसतात तेव्हाच त्या जास्त अंगप्रदर्शन करतात. अतिशय निर्लज्जपणे तेव्हा मुली वागतात. 'निर्भया इतक्या रात्री एका मुलाबरोबर का बाहेर फिरत होती? तो मुलगा तर तिचा पतीही नव्हता. घडलेल्या प्रकरणात निर्भयाची चुकी होती, हे विद्यार्थिनींना सांगण्याचा त्यां शिक्षिकेने पुरेपुर प्रयत्न केला. अशा घटनांचा सामना करणाऱ्या मुली शापित असतात आणि त्याच्यासाठी ही शिक्षा आहे, असं धक्कादायक विधानही या शिक्षिकेने केलं आहे. शिक्षिकेच्या या वक्तव्याची ऑडिओ क्लिप पोलीस तक्रारीत सादर करण्यात आली आहे. 

Web Title: raipur kv school teacher said to girl students that revealing cloths incites crime like nirbhaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.