शिक्षण ते लग्नापर्यंत असा उभा करा पैसा; कुठे करू शकता गुंतवणूक?, पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2022 02:29 PM2022-06-11T14:29:20+5:302022-06-11T14:30:01+5:30

गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय पाहणे गरजेचे आहे.

Raise money from education to marriage; Where can you invest ?, Lets see | शिक्षण ते लग्नापर्यंत असा उभा करा पैसा; कुठे करू शकता गुंतवणूक?, पाहा

शिक्षण ते लग्नापर्यंत असा उभा करा पैसा; कुठे करू शकता गुंतवणूक?, पाहा

googlenewsNext

आयुष्यात गुंतवणुकीचा योग्य पर्याय निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर होतो. मुलांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत सर्व निधी कसा तयार करावा यासाठी काही टीप्स..

गुंतवणूक करण्यापूर्वी बाजारात उपलब्ध असलेले सर्व पर्याय पाहणे गरजेचे आहे. यामध्ये परतावा आणि जोखीम या बाबी तपासल्या पाहिजेत. जर गुंतवणूक गरजेनुसार असेल तर ध्येय गाठणे सोपे जाईल.

कुठे करू शकता गुंतवणूक?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र आणि सुकन्या समृद्धी योजना या तीन सरकारी योजनांचा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये समावेश करून तुम्ही तुमची विविध आर्थिक उद्दिष्टे नक्की पूर्ण करू शकता. या सर्व योजनांचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे कोणती योजना चांगली हे तुमच्या ध्येयावर अवलंबून आहे.

भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)

७.१% व्याज या योजनेंतर्गत वार्षिक दिले जाते. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही १ कोटींहून अधिकचा फंड सहज तयार करू शकता. यामध्ये तुम्हाला मिळणारे रिटर्न पूर्णपणे करमुक्त आहेत. 

₹५०० किमान रक्कम गुंतवणूक  

  • माल गुंतवणूक १.५ लाख प्रतिवर्ष
  • पीपीएफ खात्यातील पैसे १५ वर्षांनंतर काढता येतात. यात २५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकता
  • तुम्ही तुमचे पैसे १५, २० किंवा २५ वर्षांनी काढू शकता

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएसई) 

६.८% परतावा या योजनेत वार्षिक मिळतो. यात केलेल्या गुंतवणुकीला कलम ८० सी. अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.  

₹१००० रुपये किमान गुंतवणूक आवश्यक 

  • कमाल रक्कम कितीही गुंतवू शकता. मर्यादा नाही.
  • लॉक ईन कालावधी ५ वर्षांचा आहे.
  • या योजनेत मुलांच्या नावानेही खाते उघडता येते.

सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय)  

७.६% व्याज सध्या या योजनेतील गुंतवणुकीवर वार्षिक आहे. मुलींच्या सुरक्षित भविष्यासाठी अतिशय चांगली सरकारी योजना.   

₹२५० किमान गुंतवणूक 

  • तुम्ही यामध्ये ० ते १० वर्षांच्या मुलीच्या नावावर ती १४ वर्षांची होईपर्यंत गुंतवणूक करू शकता. 
  • मुलगी २१ वर्षांची झाल्यावर व्याजासह एकरकमी रक्कम मिळेल.
  • हे खाते एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींसाठी उघडता येते.

Web Title: Raise money from education to marriage; Where can you invest ?, Lets see

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.