समुद्राची पातळी वाढल्याने भारतात चार कोटी लोकांना धोका

By admin | Published: May 21, 2016 04:33 AM2016-05-21T04:33:20+5:302016-05-21T04:34:28+5:30

वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे.

By raising the sea level, India's four million people are at risk | समुद्राची पातळी वाढल्याने भारतात चार कोटी लोकांना धोका

समुद्राची पातळी वाढल्याने भारतात चार कोटी लोकांना धोका

Next

संयुक्त राष्ट्रे : वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे किनारपट्टीवर येणारे पूर यामुळे मुंबई व कोलकाता येथील लोकांना सर्वाधिक धोका आहे. त्याचवेळी समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने २0५0पर्यंत भारतातील ४ कोटी लोकांना गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरणविषयक अहवालात म्हटले आहे. ह्यजागतिक पर्यावरणीय पूर्वानुमान : (जीईओ-६) क्षेत्रीय आकलनह्ण या शीर्षकाखाली अहवालात ही भीती व्यक्त करण्यात येत आहे. हवामानातील बदलाचा सर्वांत वाईट परिणाम पॅसिफिक आणि दक्षिण व दक्षिण-पूर्व आशियावर होण्याचा अंदाज आहे. २0५0पर्यंत समुद्राच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जगभरातील १0 देशांतील नागरी वस्त्यांवर परिणाम होणार आहे. त्यात सर्वाधिक परिणाम एशिया प्रशांत क्षेत्रातील सात देशांवर होईल, असे हा अहवाल म्हणतो. वेगाने होणारे शहरीकरण आणि आर्थिक वृद्धीमुळे चीन, भारत, थायलंड यांसारख्या देशांत आणि त्यातही खासकरून त्यांच्या अतिशहरीकृत भागांत भविष्यात विपरीत परिस्थितीला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. भारतातील मुंबई, कोलकाता; चीनमधील गुआंगझो आणि शांघाय; बांगलादेशातील ढाका; म्यानमारमधील यंगून; थायलंडमधील बँकॉक आणि व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी व हाईप्लेंग या शहरांना धोका आहे. या सर्व ठिकाणी २0७0मध्ये किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा मुकाबला करावा लागेल, असेही हा अहवाल म्हणतो. या शहरांपैकी अनेक शहरे किनारपट्टीवर येणाऱ्या पुराचा सामना पूर्वीपासूनच करीत आहेत; मात्र त्याची क्षमता आता मर्यादित होत आहे. संयुक्त राष्ट्रांचे पर्यावरणविषयक अधिवेशन पुढील आठवड्यात नैरोबीत होणार आहे. त्यापूर्वी हा अहवाल जारी करण्यात आला आहे. अहवालात पुढे म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्ती, आर्थिक संकट आणि हवामानातील बदल यामुळे लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होईल. २0५0पर्यंत भारत, बांगलादेश, चीन, इंडोनेशिया आणि फिलीपाईन्समधील ह्यवादळकेंद्रित प्रदेशह्ण होतील. त्यामुळे ५ कोटी ८0 लाख लोकांच्या जीविताला धोका निर्माण होईल. सर्वांत जास्त परिणाम होणाºया देशांत भारत प्रथम क्रमांकावर राहील. समुद्राची पाणीपातळी वाढत चालल्याने भारतातील ४ कोटी लोकांना धोका निर्माण होईल. त्यानंतर बांगलादेश अडीच कोटी, चीन दोन कोटी, फिलिपाईन्सच्या जवळपास दीड कोटी लोकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. वाढत्या शहरीकरणामुळे किनारपट्टीतील वस्त्या वाढत चालल्या आहेत. त्यामुळे या किनारपट्टीवरील प्रदेशाची क्षमता कमालीची प्रभावित झाली आहे. तेथील धोका वाढला आहे, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: By raising the sea level, India's four million people are at risk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.