"जय श्रीराम" चे नारे देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली नासधूस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 12:04 PM2021-01-21T12:04:48+5:302021-01-21T12:14:00+5:30
Demolished Toilet Complex : शौचालयाच्या जवळच बस स्टॉप असल्याने अनेक प्रवासी या शौचालयाचा वापर करत होते.
नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी "जय श्रीराम"ची घोषणा देत सार्वजनिक शौचालयाची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शौचालय मंदिराच्या भिंतीजवळ असल्याचं म्हणत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी या शौचालयाची तोडफोड केली आहे. जवळपास 40 वर्षे जुनं असलेलं हे शौचालय मंदिराच्या भिंतीपासून काही फुटांच्या अंतरावर आहे. तसेच मंदिर आणि शौचालयादरम्यान एक छोटी गल्लीही आहे. शौचालयाच्या जवळच बस स्टॉप असल्याने अनेक प्रवासी या शौचालयाचा वापर करत होते.
काही दिवसांपूर्वीच या शौचालयाच्या आधुनिकीकरणाचं कामही करण्यात आलं होतं. बुधवारी (20 जानेवारी) दुपारच्या सुमारास बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 'जय श्रीराम, जय श्रीराम', 'एक ही नारा एक ही नाम - जय श्रीराम जय श्रीराम' अशा घोषणा देत मोठ-मोठ्या हातोड्यांनी टॉयलेट कॉम्प्लेक्सवर घाव घाले आणि या शौचालयाची खूप तोडफोड केली. यामध्ये महिला आणि दिव्यांगासाठी बनवण्यात आलेल्या शौचालयाचाही समावेश असून त्याचंही नुकसान झालं आहे.
धक्कादायक! जिवंत आहे हे सांगण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून वृद्ध महिला मारतेय सरकारी कार्यालयाच्या फेऱ्या https://t.co/LlyUdqD1rU
— Lokmat (@MiLOKMAT) January 20, 2021
अखिल भारत हिंदू महासभेचे पश्चिम उत्तर प्रदेश अध्यक्ष असल्याचं सांगत विष सिंह कंबोज हे या शौचालयावरील हल्ल्यांचं नेतृत्व करत होते. 'दोन दिवसांपूर्वी आमचे हिंदू योद्धे येथे आले होते. त्यांनी दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. मात्र येथे कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे आम्हीच हे शौचालय हटवण्याचा निर्णय घेतला' अशी माहिती कंबोज यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना दिली आहे.
निर्भया केंद्रावर सुरू असलेल्या काऊन्सिलींगदरम्यान 17 वर्षाच्या मुलीने सांगितला भयंकर अनुभव, केला धक्कादायक खुलासा https://t.co/IqopzCmV6J#Rape#crime#crimesnews
— Lokmat (@MiLOKMAT) January 19, 2021
शौचालय 40 वर्षे जुनं
शौचालयात साफसफाई सुपरवाजयर म्हणून काम करणाऱ्या विमला यांनी मात्र हे शौचालय 40 वर्षे जुनं असल्याचं म्हटलं आहे. मंदिर आणि शौचालयात अंतर आहे. मंदिर आणि शौचालया दरम्यान एक छोटा नालाही आहे. आम्ही त्यांना शौचालयाची नासधूस करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला मात्र कोणीही आमचं ऐकलं नाही. या शौचालयाचा अनेक पुरुष, महिला, दिव्यांग वापर करतात, आता ते कुठे जाणार? असा प्रश्नही विमला यांनी विचारला आहे. तर शौचालयाची तोडफोड करणाऱ्या लोकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असं प्रशासनानं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
ड्रॅगन फ्रूटचं नवीन नाव माहितीय का?; बदलण्यामागे "हे" आहे कारणhttps://t.co/gwgtvvRAyG#dragonfruit#Gujarat#VijayRupani
— Lokmat (@MiLOKMAT) January 20, 2021