राज कपूर यांची हवेली इतिहासजमा होणार?

By admin | Published: January 18, 2016 03:36 AM2016-01-18T03:36:15+5:302016-01-18T03:36:15+5:30

हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकार राज कपूर यांचे जन्मस्थान असलेली पाकिस्तानातील पेशावरमधील हवेली लवकरच इतिहासजमा होणार आहे.

Raj Kapoor's mansion history? | राज कपूर यांची हवेली इतिहासजमा होणार?

राज कपूर यांची हवेली इतिहासजमा होणार?

Next

इस्लामाबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील महान कलाकार राज कपूर यांचे जन्मस्थान असलेली पाकिस्तानातील पेशावरमधील हवेली लवकरच इतिहासजमा होणार आहे. खैबर-पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारने ही हवेली वाचवण्यासाठी ठोस योजना सादर न केल्यामुळे ही ९८ वर्षे जुनी हवेली पाडण्याचे काम सुरू झाल्याची माहिती एका स्थानिक वृत्तपत्राने दिली आहे. प्रशासनाने आताच्या मालकाकडून हे घर खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. या घराचे संग्रहालयामध्ये रूपांतर करण्याची योजना होती; मात्र किमतीच्या मुद्यावरून व्यवहार फिस्कटला.
गुरु वारी या हवेलीचे छप्पर पाडण्यात आले. पेशावरमधील धाकी मुनावर शहा भागात ही इमारत आहे. राज कपूर यांच्या पूर्वजांनी बांधलेली मूळ हवेली सहा मजली होती; मात्र दोन दशकांपूर्वी इमारत कमकुवत झाल्याचे कारण पुढे करून या इमारतीचे तीन मजले पाडण्यात आले.
थेट हवेली पाडली तर कारवाई होऊ शकते, त्यामुळे हळूहळू ही हवेली पाडण्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी हॉटेल किंवा मॉल उभारण्याची योजना आहे. १४ डिसेंबर १९२४ रोजी राज कपूर यांचा या हवेलीत जन्म झाला होता. राज कपूर यांचे बंधूशम्मी कपूर आणि शशी कपूर यांचा जन्म भारतात झाला; पण त्यांनी या हवेलीला भेट दिली होती.
१९४७ साली फाळणीनंतर कपूर कुटुंब भारतात आले, त्यानंतर या हवेलीची मालकी दुसऱ्याकडे गेली. राज कपूर यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले तरी, त्यांच्या मुलांनी वेळोवेळी या हवेलीला भेट दिली होती. राज कपूर यांची मुले रणधीर कपूर आणि ऋषी कपूर १९९० मध्ये या हवेलीमध्ये आले होते. त्यावेळी स्थानिकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Raj Kapoor's mansion history?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.