करून दाखवलं! वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी सुरू केली कंपनी, 'हा' 22 वर्षीय तरुण आज करोडपती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 06:19 PM2023-04-05T18:19:40+5:302023-04-05T18:24:02+5:30

ज्या वयात मुलं शाळेत मजामस्ती करत असतात त्या वयात एका मुलाने कंपनीचा पाया रचला.

raj mehta did not like going to school by bicycle he started electric scooter company at age of 14 | करून दाखवलं! वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी सुरू केली कंपनी, 'हा' 22 वर्षीय तरुण आज करोडपती

करून दाखवलं! वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी सुरू केली कंपनी, 'हा' 22 वर्षीय तरुण आज करोडपती

googlenewsNext

एखाद्या कामाची आवड असेल तर मार्ग तयार होतो. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. ज्या वयात मुलं शाळेत मजामस्ती करत असतात त्या वयात एका मुलाने कंपनीचा पाया रचला. त्याची शाळा घरापासून लांब होती. त्यामुळे सायकलने शाळेत जाताना तो खूप थकायचा. याच दरम्यान एक दिवस त्याने सायकलचे इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतर करण्याचे सूत्र सापडले. इथून त्याचं आयुष्य बदललं. ऑटोमोबाईल कंपनी स्थापन करणारा तो जगातील सर्वात तरुण उद्योजक ठरला. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्याने आपली ऑटोमोबाईल कंपनी सुरू केली. 

वयाच्या 17 व्या वर्षी त्यांना आयात-निर्यात परवाना मिळाला. याआधी भारतात एवढ्या कमी वयात कोणालाही हा परवाना मिळाला नव्हता. आज या 22 वर्षीय तरुणाचे देशात आणि जगात शोरूम आहेत. राज मेहता असं या तरुणाचं नाव आहे. राज मेहता हा गुजरातमधील महिसागर येथील रहिवासी आहेत. राज लहानपणापासूनच जिज्ञासू स्वभावाचा होता. घरापासून शाळा 10 ते 15 किमी अंतरावर होती. रोज सायकलवर एवढं लांब अंतर पार करणं त्यांना खूप अवघड जात होतं. मग तो मार्ग शोधू लागला. एके दिवशी तो त्याच्या फिजिक्सच्या शिक्षकाकडे गेला आणि त्याने त्याची सायकल इलेक्ट्रिक सायकलमध्ये कशी बदलता येईल, असे विचारले. 

शिक्षकाने पद्धत समजावून सांगितली पण ती पुरेशी नव्हती. ती पद्धत अंमलात आणण्यासाठी त्याच्याकडे ना पैसे होता ना संसाधनं. तरीही त्या दिशेने वाटचाल करण्याचे ठरवले. भंगार विक्रेत्यांकडून कारचे पार्टस आणले. यावेळी त्याने आपल्या बचतीचे सुमारे 40 ते 45 हजार रुपये यामध्ये गुंतवले होते. प्रयोग करत असताना त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी कळल्या जे कोरियातून आयात करावे लागतात. यासाठी त्याने वडिलांकडे पैसे मागितले. परंतु, त्यांनी तसे करण्यास नकार दिला.

पैशासाठी राज मेहताने छोट्या नोकऱ्याही केल्या. मात्र, त्यामुळे पैशांची व्यवस्था होऊ शकली नाही. आजोबा गावकऱ्यांना उधारीवर पैसे द्यायचे. त्याचे दागिन्यांचे दुकानही होते. प्रत्येक पैशाचा हिशोब नातवाला देईल या अटीवर आजोबांनी पैसे दिले. राजने यासाठी होकार दिला. . राज ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रयोग करत राहिला. तो फक्त 4 तास झोपायचा आणि उरलेला वेळ तो मशीन बनवण्यात गुंतलेला असायचा. शेवटी, त्याने सायकलला इलेक्ट्रिक सायकलमध्ये रूपांतरित करण्यासाठी एक प्रोटोटाइप बनवला. प्रथम वडिलांना या सायकलची चाचणी घेण्यास सांगितले.

राज मेहताचा व्यवसाय दिवसेंदिवस चौपट वाढू लागला. केवळ भारतीयच नव्हे तर परदेशी ग्राहकांनाही सेवा देण्यास सुरुवात केली. वयाच्या 14 व्या वर्षी ऑटोमोबाईल कंपनी सुरू करून या क्षेत्रातील जगातील सर्वात तरुण उद्योजक बनला आहे. तरुण वयामुळे त्यांना परदेशी व्यापार महासंचालनालयाकडून परवाना मिळविण्यातही अडचणी आल्या. 20व्या प्रयत्नात त्यांचा अर्ज स्वीकारण्यात आला. जून 2019 मध्ये राज मेहता यांनी त्यांच्या कंपनीअंतर्गत आणखी एक ब्रँड लॉन्च केला. त्याचे नाव आहे 'ग्रेटा इलेक्ट्रिक स्कूटर्स'. ही कंपनी परवडणाऱ्या किमतीत इलेक्ट्रिक स्कूटर देते. ग्रेटाचे देशभरात अनेक शोरूम आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: raj mehta did not like going to school by bicycle he started electric scooter company at age of 14

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.