राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो- आठवले

By admin | Published: July 27, 2016 10:16 PM2016-07-27T22:16:42+5:302016-07-27T22:28:55+5:30

अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.

Raj Thackeray is not able to abolish the Atrocity Act- Athavale | राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो- आठवले

राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो- आठवले

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 27 - अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याच्या मुद्द्यावर रामदास आठवलेंनी राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे बोलल्यानं अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला फारसं गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. देशातील दलितांवर वाढत्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी अ‍ॅट्रॉसिटी कायदा बनवण्यात आला आहे, असंही आठवलेंनी म्हटलं आहे. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायदा आम्ही रद्द होऊ देणार नाही, अशी भूमिकाही आठवलेंनी मांडली आहे.
राज ठाकरेंच्या म्हणण्याला अर्थ नाही. त्यांना कोणीही गांभीर्यानं घेत नाही. राज ठाकरे नेहमीच दलितविरोधी भूमिका मांडतात. कोपर्डीतल्या ज्या मुलीवर बलात्कार झाला, तिच्या आरोपींना पकडून कठोरातली कठोर शिक्षा करण्याची मागणी आम्ही केली असल्याचं यावेळी रामदास आठवलेंनी सांगितले.

(राज ठाकरेंच्या विरोधात अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा!)


कोपर्डीत झालेल्या बलात्कारानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यानंतर बलात्कारासारखे गुन्हे रोखण्यासाठी शरियतसारखे कायदे देशात लागू करण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. अ‍ॅट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यानं तो रद्द करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

(अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करायला हवा- राज ठाकरे)

दरम्यान, या वक्तव्यानंतर भारिप बहुजन महासंघाने राज ठाकरेंविरोधात जालन्यात तक्रार दाखल केली आहे. "राज ठाकरे हे लोकशाहीविरोधी असून, त्यांना संविधान मान्य नसल्याचं म्हटलं आहे. त्यांनी दलितांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळेच राज ठाकरेंवर अ‍ॅट्रॉसिटी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करा, अशी मागणी भारिपने तक्रारीत केली आहे.

Web Title: Raj Thackeray is not able to abolish the Atrocity Act- Athavale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.