हिंदी भाषा आमच्यावर लादून माथी भडकवू नका; मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2019 10:10 AM2019-06-03T10:10:07+5:302019-06-03T10:16:37+5:30

अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केले होते. तसेच राष्ट्रीय शिक्षा नीतीच्या मसुद्याची समिक्षा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटले. सीतारमन आणि एस. जयशंकर हे दोन्ही मंत्री तामिळनाडूतील आहेत.

raj thackerays party mns statement against new education plan | हिंदी भाषा आमच्यावर लादून माथी भडकवू नका; मनसेचा इशारा

हिंदी भाषा आमच्यावर लादून माथी भडकवू नका; मनसेचा इशारा

Next

मुंबई - गैरहिंदी भाषिक राज्यांमध्ये हिंदी भाषा शिकविण्याचा प्रस्ताव देणाऱ्या राष्ट्रीय शिक्षा नीती २०१९ च्या मसुद्यावरून देशात वाद वाढतच आहे. या मसुद्याला तामिळनाडू राज्यातून विरोध दर्शविण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र निवनिर्माण सेना या मुद्दावर आक्रमक झाली आहे. तसेच हिंदी राष्ट्रभाषा नसल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे.

मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मनसे नेते अनिल शिदोरे यांनी मनसेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, हिंदी काही राष्ट्रभाषा नाही. उगाच ती आमच्यावर लादून माथी भडकवू नका, असा इशारा शिदोरे यांनी ट्विट करून दिला. तत्पूर्वी रविवारी केंद्र सरकारने या मुद्दावर आपला बचाव करताना हिंदी भाषा कोणत्याही राज्यावर थोपविणार नसल्याचे स्पष्ट केले होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी या संदर्भात ट्विट केले होते. तसेच राष्ट्रीय शिक्षण नीतीच्या मसुद्याची समिक्षा करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटले. सीतारमन आणि एस. जयशंकर हे दोन्ही मंत्री तामिळनाडूतील आहेत.

हिंदी भाषा राज्यात शिकविण्याच्या मुद्दावर सर्वप्रथम तामिळनाडूमधून विरोध करण्यात आला होता. त्यामुळे मोदी सरकारमधील मंत्र्यांनी तमिळमध्ये ट्विट केले होते. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांनी देखील शिक्षा नीतीच्या मसुद्याचा अभ्यास, विश्लेषण आणि चर्चा करण्याच्या सूचना केल्या आहेत.

Web Title: raj thackerays party mns statement against new education plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.