'कलम 370 रद्द'वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 09:27 PM2019-08-05T21:27:01+5:302019-08-05T21:31:46+5:30
गेल्या काही काळापासून केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपल्या टीकेने घायाळ करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई - काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. गेल्या काही काळापासून केंद्रातील नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना आपल्या टीकेने घायाळ करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली असून, गेल्या काही काळात केंद्र सरकारने घेतलेला हा उत्तम निर्णय आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणार कलम 370 हटवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आज संध्याकाळी जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक राज्यसभेत मंजूर झाले. त्यानंतर राज ठाकरे यांनी ट्विटरवरून एका ओळीची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यात ते म्हणतात की, ''गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !''
#Article370Scrapped#Kashmir
— Raj Thackeray (@RajThackeray) August 5, 2019
गेल्या काही काळातील केंद्र सरकारचा उत्तम निर्णय !
After a long time, the Central Govt makes an exceptional decision !
दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला 370 कलम रद्द करत विभाजन करण्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत मांडला होता. यावर राज्यसभेत आज चर्चा करण्यात आली. त्यानंतर विरोधकांनी मतविभागणीची मागणी केल्याने झालेल्या मतदानामध्ये हा प्रस्ताव 125 विरुद्ध 61 मतांनी पारित करण्यात आला.